AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे म्हणाले, ‘आपण भेटूयात’, मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी क्वारंटाईन आहे!’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली होती. तशी विनंती केली होती. पण मुख्यमंत्री क्वारन्टाईन असल्याने ही भेट होऊ शकली नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. (Raj Thackeray said, Lets meet, CM Uddhav Thackeray said, I am a quarantine!)

राज ठाकरे म्हणाले, 'आपण भेटूयात', मुख्यमंत्री म्हणाले, 'मी क्वारंटाईन आहे!'
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 12:18 PM

मुंबई : “कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या कडक निर्बंध लादले गेले आहेत. या संदर्भाने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली होती. तशी विनंती केली होती. पण मुख्यमंत्री क्वारन्टाईन असल्याने ही भेट होऊ शकली नाही. काल आम्ही झूम मिटिंगद्वारे चर्चा केली”, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली. (Raj Thackeray said, Lets meet, CM Uddhav Thackeray said, I am a quarantine!)

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद (Raj Thackeray Press Conference) घेत मुख्यमंत्री आणि त्यांच्यातल्या बैठकीचा तपशील सांगितला. बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेत असल्याचं राज यांनी सांगितलं.

राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मी फोन केला होता. महाराष्ट्रात सुरु असलेल्या लॉकडाऊनबाबत तसंच घातलेल्या निर्बंधाविषयी बोलण्याकरिता भेटीची विनंती केली होती. मात्र त्यांचा मला फोन आला. त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक कोरोनाग्रस्त असल्याने ते क्वारंन्टाईन असल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे प्रत्यक्ष भेट न होता ही बैठक झूम अॅपवर झाली. त्यांना दिलेल्या सूचना सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केल्याचं त्यांनी सांगितलं.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांना टोला

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. ‘मी किंबहुना वापरलं तर चालेल ना?’, अशी मजेशीर कोटी त्यांनी केली. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात ‘किंबुहना’ शब्दाचा बऱ्याचदा वापर करताना दिसतात. यावरुनच राज ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोणत्या सूचना केल्या?

छोट्या व्यापाऱ्यांना दोन दिवस दुकानं उघडण्याची परवानगी द्या

जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलंय पण विक्रीला बंदी आहे, असं असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे, विकायचं नाही तर उत्पादन का करायचं… म्हणून मी सांगितलं दोन तीन दिवस विक्रीसाठी सुरु ठेवा. छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून २-३ दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्या…

बँकांची जबरदस्ती थांबवावी

अनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?

वीज बिल आणि व्यवसाय कर 

सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे आणि जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना  सूट द्यावी, राज्याने केंद्राशी बोलावं, अशी सूचना केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

कंत्राटी कामगार 

लॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतलं होतं, पण नंतर काढून टाकलं.. मी सूचना केली, त्यांना घ्या, तहान लागली की विहीर खोदणं योग्य नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना परत सेवेत घेऊन त्यांची कायमस्वरुपी व्यवस्था करावी, अशी सूचना दिली.  या सूचना योग्य आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळाशी बोलण्याचं आश्वासन दिलं.

जीम सलून यांना परवानगी द्या

जीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी. स्वीमिंग पूल बंद ठिक आहे. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी.

महाराष्ट्रात दोन कारणांमुळे रुग्णवाढ

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. एकतर बाहेरच्या राज्यांमधून महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणावर लोक येत आहेत. दुसऱ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे देशात फक्त महाराष्ट्रातच कोरोना रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

(Raj Thackeray said, Lets meet, CM Uddhav Thackeray said, I am a quarantine!)

हे ही वाचा :

‘किंबहुना’ वापरलं तर चालेल ना; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शैलीवर मिश्किल टिप्पणी

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सर्वात महत्त्वाच्या सूचना नेमक्या काय?

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.