Raj Thackeray Video : ‘जगू द्याल की नाही? बंद कर ते…’, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकारांवर संतापले!

राज ठाकरे यांनी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीला भेट दिली. तिथे त्यांनी अनेक पुस्तके चाळली आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची काही पुस्तके विकतही घेतली. तसंच तिथे उपस्थित वाचकांना त्यांनी ऑटोग्राफही दिला. मात्र, जेव्हा ते गाडीतून उतरले त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापल्याचं पाहायला मिळालं.

Raj Thackeray Video : 'जगू द्याल की नाही? बंद कर ते...', मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकारांवर संतापले!
राज ठाकरे माध्यम प्रतिनिधींवर संतापलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 11:42 AM

पुणे : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुनही राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे हे आपल्या भाषणशैलीमुळे आणि रोखठोक वक्तव्यांमुळे माध्यमांमध्येही नेहमीच चर्चेत असतात. तर कधी ते माध्यमांच्या प्रतिनिधींवर (Journalists) संतापलेलेही पाहायला मिळतात. आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला. राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीला (Book Gallery) भेट दिली. तिथे त्यांनी अनेक पुस्तके चाळली आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची काही पुस्तके विकतही घेतली. तसंच तिथे उपस्थित वाचकांना त्यांनी ऑटोग्राफही दिला. मात्र, जेव्हा ते गाडीतून उतरले त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापल्याचं पाहायला मिळालं.

हे सुद्धा वाचा

का संतापले राज ठाकरे?

त्याचं झालं असं की राज ठाकरे हे अक्षरधारा बुक गॅलरीला भेट देण्यासाठी आले असता, तिथे अनेक माध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरामन उपस्थित होते. संध्याकाळची वेळ असल्यामुळे कॅमेरावर फोकसही लावण्यात आला होता. मात्र, त्याचा त्रास जाणवू लागल्याने राज यांनी ते बंद करायला लावले. त्यावेळी थोडं पुढे येत काय जगू द्याल की नाही? बंद कर ते.. वेगळं सांगू का सगळ्यांना? असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंकडून केतकी चितळेचा समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीवादाचं विष पेरलं गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता. राज यांच्या आरोपांना खुद्द शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आलं. एकीकडे जातीवादाच्या मुद्द्यावरुन पवारांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरे यांनी आज पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेचा चांगलाच समाचार घेतलाय.

‘आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येण साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे’, अशा शब्दात राज यांनी केतकीच्या पोस्टचा समाचार घेतला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.