राज ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचं विधान केलं आहे. (raj thackeray will back on hindutva issue says chandrakant patil)

राज ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
raj thackeray
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 1:14 PM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचं विधान केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे हे परप्रांतियांचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का? असा सवाल केला जात आहे. (raj thackeray will back on hindutva issue says chandrakant patil)

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हे मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे यांच्याशी भेट झाल्यावर परप्रांतियांचा मुद्दा आणि हिंदुत्व या दोन विषयावर त्यांच्याशी चर्चा झाली. यावेळी राज यांनी कोविडच्या दीड वर्षात माझी भूमिका मी जनतेपर्यंत पोहोचवू शकलो नाही. आता कोविड कमी झाला. मी हिंदुत्वाची जी लाईन पकडली होती ती अधिक तेज करेल, पण अन्य प्रांतियांच्याबाबत माझ्या मनात घृणा आणि द्वेष नाही, असं राज यांनी सांगितल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.

मी कन्व्हिन्स झालो

राज ठाकरे हे परप्रांतियांच्ंया विरोधात असल्याचं चित्रं आहे. हे चित्रं त्यांनी बदललं पाहिजे. त्यांनी भूमिका व्यापक करत नाही, तोपर्यंत थोडी मर्यादा राहील. त्यांनी भूमिका सांगितली. आता ती व्यवहारात आणली पाहिजे. ते तेवढं शक्य नाही. त्यांच्या मनात कुणाबद्दल कटुता नाही याबाबत मी कन्व्हिन्स झालो आहे. पण याचा निष्कर्ष असा नाही की उद्याच निवडणुकीवर चर्चा होईल आणि जागा वाटप होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राऊतांनी निवडणूक लढवून दाखवावी

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. येत्या पालिका निवडणुकीत संजय राऊतांनी मुंईतील सेफ जागा शोधावी आणि तिथून निवडणूक लढवावी. अमेरिकेची राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायला सज्ज आहोत अशा थाटात राऊत दंड थोपटतात. त्यांनी दंडही चेक करावे आणि त्यांची क्षमताही चेक करावी, असा टोला त्यांनी लगावला.

युतीचा प्रस्ताव नाही

त्यांनी परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मी गेल्या वर्षभरापासून सांगितलं आहे. त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली. मी ते ऐकलं. त्यावरून आमच्यात चर्चा झाली. ही सदिच्छा भेटी होती. राजकीय चर्चा झाली. पण या भेटीत युतीचा प्रस्ताव नाही, असं पाटील यांनी सांगितलं.

प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते

प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. नाशिकला ते ही जातात मी ही जातो. आम्ही अचानक भेटलो. मी गेले वर्षभर बोलतोय त्यांनी त्यांची भूमिका बदलावी. नाशिकमध्ये समोरासमोर भेटलो, आज चर्चा झाली. राजसाहेब म्हणाले, यूपीतील माणसाला यूपीमध्ये 80 टक्के नोकऱ्या हव्या, हे मी यूपीत जाऊन म्हणेन, तसंच मी महाराष्ट्रातील मराठी मुलांना इथेच रोजगार मिळायला हवा असंही त्यांनी सांगितलं. यात गैर काय आहे? असा सवालही त्यांनी केला. (raj thackeray will back on hindutva issue says chandrakant patil)

संबंधित बातम्या:

राजकीय चर्चा नक्कीच झाली, पण युतीची चर्चा नाही; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?, चंद्रकांत पाटील यांनी डिटेल सांगितलं!

राज ठाकरेंबद्दल तेव्हापासूनच अट्रॅक्शन, व्हेरी नाईस पर्सनॅलिटी, फक्त दिसणंच नाही… : चंद्रकांत पाटील

(raj thackeray will back on hindutva issue says chandrakant patil)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.