भाजप-मनसे युतीचा नारळ फुटला, राज्यातील पहिली युती ‘या’ जिल्ह्यात जाहीर!

जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडींबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. राज्यातील सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते म्हणजे मनसे आणि भाजपची (MNS BJP) युती होणार की नाही याकडे.

भाजप-मनसे युतीचा नारळ फुटला, राज्यातील पहिली युती 'या' जिल्ह्यात जाहीर!
Chandrakant Patil_Raj Thackeray
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 3:51 PM

पालघर : जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडींबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. राज्यातील सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते म्हणजे मनसे आणि भाजपची (MNS BJP) युती होणार की नाही याकडे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी महिन्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर, मनसे-भाजप युतीच्या चर्चांना जोर आला आहे. त्यातच आज पुण्यात (Pune) मनसे नेत्यांनी भाजपसोबत युतीची जाहीर मागणी केली आहे. असं असताना राज्यातील पहिली मनसे आणि भाजपची अखेर पालघरमध्ये (Palghar) झाली आहे.

पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यााबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरु आहे.

पुण्यातील मनसे नेते भाजपसोबत युतीसाठी आग्रही

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे. तसे केल्यास या निवडणुकीत मनसेला फायदा होईल, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.

चंद्रकांत पाटील-राज ठाकरेंची नाशिकमध्ये भेट 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दोन महिन्यापूर्वी नाशिकमध्ये भेट झाली होती. त्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील घरी जाऊनही भेट घेतली. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीबाबतच्या चर्चांना बळ आलं. चंद्रकांत पाटील यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचं चंद्रकांत पाटलांनी मान्य केलं मात्र, आगामी निवडणुकीबाबत युतीसाठी कसलाही प्रस्ताव दिला नसल्याचंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं होतं.

असं असलं तरी दोन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठींमुळे कार्यकर्त्यांच्या युतीबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्यभरात भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा सुरु असताना, पालघरमध्ये पोटनिवडणुकीसाठी युती झाली आहे.

पालघर पोटनिवडणूक 

पालघर जिल्हापरिषदेत 57 सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना 18, राष्ट्रवादी 17, भाजप 12, माकप 5, बहुजन विकास आघाडी 4, तर काँग्रेसचा एक असे सदस्य निवडून आलेले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अपक्ष मिळून बहुमताचा आकडा पार करत महाविकास आघाडीनं जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाने जिल्हा परिषदेतील 15 सदस्य, तर पालघर, डहाणू, वाडा आणि वसई या चार पंचायत समिती मधील 14 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलं होतं.

पालघर जिल्हा परिषेदेवरील 15 जणांचे सदस्यत्व रद्द

जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17 सदस्यांपैकी 8, शिवसेनेच्या 18 सदस्यांपैकी 3, भाजपच्या 12 सदस्यांपैकी 3 तर माकपच्या 5 सदस्यांपैकी 1, अशा एकूण 15 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. 57 सदस्यांपैकी 15 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने उर्वरित 42 सदस्यसंख्येमुळे बहुमताचा झालेला 22 हा आकडा गाठण्यात महाविकास आघाडीला कुठलीही अडचण निर्माण झाली नाही. त्यामुळे अध्यक्षपदी शिवसेनेच्या वैदेही वाढाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर सांबरे ह्यांची निवड झालेली आहे.

संबंधित बातम्या    

पालघर झेडपी आणि पंचायत समिती पोटनिवडणूक; उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, कशी आहे राजकीय स्थिती?

राज ठाकरे माझ्या घरी चहाला आले तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस असेल : चंद्रकांत पाटील

राज ठाकरेंच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास, ते लिंक पाठवणार आहेत, भेटीनंतर चंद्रकांतदादांनी गप्पांचे डिटेल्स सांगितले

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.