Raj Thackrey Speech : ‘राष्ट्रवादीनं दुसऱ्या जातीचा द्वेष करायला लावला’, राज ठाकरेंचा शरद पवारांवर पुन्हा थेट आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीवाद फोफावला. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय.

Raj Thackrey Speech : 'राष्ट्रवादीनं दुसऱ्या जातीचा द्वेष करायला लावला', राज ठाकरेंचा शरद पवारांवर पुन्हा थेट आरोप
शरद पवार, राज ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 9:09 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा शनिवारी शिवतीर्थावर पार पडला. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ धडाडल्याचं दोन वर्षांनंतर पाहायला मिळालं. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला करत थेट आरोप केला. जातीवादाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलाय. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीवाद फोफावला. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. या आधी जात नव्हती का तर होती. पण त्यावेळी जातीचा अभिमान होता. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला लावला गेला’, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केलाय.

जातीवादावरुन शरद पवारांवर थेट हल्ला

राज ठाकरे म्हणाले की, हिंदुत्वावर बोलणार. माझ्या दृष्टीकोनातून हिंदुत्व काय हे मांडणार आहे. आयोध्येला जाणार की नाही तर जाणार. आता तारीख सांगत नाही. हिंदू मुस्लिम दंगलीत हिंदू आणि मुसलमान असतो. 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला तो भारतीय असतो. चीनने आक्रमण केलं तर कळत नाही आपण कोण आहोत. मग जेव्हा हिंदू ना भारतीय असतो तेव्हा तो होतो मराठी, तमिळ, बंगाली, गुजराती पंजाबी. मग त्यावेळी आपण मराठी होतो. मराठी झाल्यानंतर मग तो होतो मराठा, तो होतो माळी, तो होतो ब्राह्मण , आगरी. काही लोकांना ही गोष्ट हवी आहे. काही लोकं कशाला राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे. शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. 1999ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. या आधी जात नव्हती का तर होती. पण त्यावेळी जातीचा अभिमान होता. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला लावला. फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचं अमिष दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. इतिहास वाचायचा नाही. लिहिलंय कुणी, पुरंदरे ब्राह्मण. अच्छा अच्छा.. म्हणजे त्याने काही तरी चुकीचं लिहिलं असणार. आम्ही इतिहास वाचतच नाही. ज्या छत्रपती शिवरायाने स्वराज्यासाठी एक व्हा सांगितलं. तिथे जातीपातीवरून वाद सुरू आहे. राजकारण सुरू आहे. जातीतून बाहेर नाही पडणार तर हिंदू कधी होणार? असा सवालही राज यांनी यावेळी विचारला.

महाराष्ट्राची ही अवस्था करायची आहे का?

बाहेरच्या राज्यात ज्याप्रकारचं राजकारण चालतं ते करायचं आहे का? ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र जातीत खितपत पडलाय. हे शिदोरे बसले. उत्तर प्रदेशात गेले. एका ढाब्यावर खाटेवर बसले. चहा सांगितला. काऊंटरवरचा माणूस आला. कौनसी जातसे हो. त्याने जात सांगितली. अरे इनको चाय देना, हे वातावरण महाराष्ट्रात आणायचं आहे का? ही अवस्था करायची महाराष्ट्राची? असे प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केलेत.

हिंदू म्हणून कधी एक होणार आहोत?

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जेम्स लेन जन्माला आला. कोण जेम्स लेन? तो आधी कधी माहिती नव्हता. आता काय करतो माहीत नाही. तो काय जॉर्ज बर्नाड शॉ होता? पुस्तकात काही तरी छापायचं आणि त्यावरून राजकारण करायचं त्या भिकारड्याने काही तरी लिहिलं आम्ही ते उगाळतोय. ज्यांना इतिहास माहीत नाही. त्यावर सर्व माणसं प्रश्न विचारतात. काय लिहिलं पुस्तकात आम्ही आपली अब्रू काढतो. ज्यांचा देशाशी संबंध नाही, ते लोक येतात. काही तरी लिहितात त्यावरून राजकारण तापवलं जातं. ज्यांचा संबंध नाही अशी माणसे प्रश्न विचारतात लाज वाटते. आमच्या देवतांची आम्ही अब्रु काढतोय. एवढंही भान नाही, कसलंही भान नाही. वेडेपिसे झाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पैशाचा चारा टाकायचा आणि वेडेपिसे करायचे. मागचा पुढचा विचार न करता डोके फोडतोय. जातीपातीतून बाहेर येत नाही. कोणता हिंदुत्वाचा ध्वज घेऊन बसलोय. हिंदू म्हणून कधी एक होणार आहोत? असला भावनिक सवालही राज यांनी जनतेला विचारलाय.

इतर बातम्या : 

Raj Thackrey : ‘साला पळून कोणा बरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केलं?’ उद्धव ठाकरेंच्या जुगाडावर राज ठाकरेंचं थेट बोट

Raj Thackeray LIVE Speech : तीन नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि दोन नंबरच्या भाजप शिवसेनेला फिरवत होता : राज ठाकरे

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.