रजनीकांत निवडणूक लढवणार नाहीत, पक्षाचीही माघार!

चेन्नई : भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार रजनीकांत यांचा पक्ष किंवा ते स्वत: आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. अभिनेते रजनीकांत यांनी प्रसिद्धीपत्रक काढूनच तशी घोषणा केली आहे. तसेच, कुणीही निवडणुकीत रजनीकांत यांचे फोटो, पक्षाचे चिन्ह कुठल्याही प्रसिद्धीसाठी वापरु नयेत, अशाही सूचना या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आल्या आहेत. रजनीकांत यांनी अचानक निवडणुका न लढवण्याचा निर्णय का घेतला, […]

रजनीकांत निवडणूक लढवणार नाहीत, पक्षाचीही माघार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

चेन्नई : भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार रजनीकांत यांचा पक्ष किंवा ते स्वत: आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. अभिनेते रजनीकांत यांनी प्रसिद्धीपत्रक काढूनच तशी घोषणा केली आहे. तसेच, कुणीही निवडणुकीत रजनीकांत यांचे फोटो, पक्षाचे चिन्ह कुठल्याही प्रसिद्धीसाठी वापरु नयेत, अशाही सूचना या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आल्या आहेत. रजनीकांत यांनी अचानक निवडणुका न लढवण्याचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप सविस्तर कारण कळू शकलेले नाही.

रजनीकांत यांनी काय घोषणा केली आहे?

“आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्या पक्षाचं कुठल्याही इतर पक्षाला समर्थन नाही. त्यामुळे कुणीही माझा किंवा माझ्या पक्षाच्या चिन्हाचा, झेंड्याचा वापर करु नये. रजनी मक्कल मन्दरम आणि रजनी फॅन क्लबच्या चिन्हाचाही वापर करु नये.”, असे रजनीकांत यांनी सांगितले.

अभिनेते रजनीकांत यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी पक्षाच्या नावाची घोषणा करत, राजकीय एन्ट्री घेतली होती. ‘रजनी मक्कल मन्दरम’ असे रजनीकांत यांच्या पक्षाचे नाव आहे. रजनी फॅन क्लबलाच रजनीकांत यांनी राजकीय पक्षात रुपांतरित केले होते. दक्षिण भारतात रजनी फॅन क्लबचे लाखोंमध्ये सदस्य आहेत. शिवाय, रजनीकांत यांचा चाहतावर्ग भारतासह परदेशातही मोठा आहे.

राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर रजनीकांत यांनी जनतेमध्ये जात अनेक सभा, बैठका घेतल्या होत्या. तामिळनाडूत पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्या प्रश्नासह अनेक प्रश्नांवर रजनीकांत यांनी जाहीर भूमिका घेण्यास सुरुवात केली होती. अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय उतरण्यापासून जाहीर पाठिंब्याची घोषणा केली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रजनीकांत बदल घडवतील का, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. तोच आपण आगामी लोकसभा निवडणुका लढवणार नसल्याचे घोषित करुन रजनीकांत यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.