मुंबई : शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या भावना महाविकास आघाडीच्या सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली. यावेळी राजू शेट्टी यांनी पवारांकडे मुख्यमंत्र्यांची तक्रार केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नाहीत, अशी खंत राजू शेट्टी यांनी पवारांकडे व्यक्त केली. (Raju Shetti meet Sharad pawar And Ajit pawar Over Agriculture law)
नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आले नाही, असं राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना सांगितलं. त्यावर पवारांनी याविषयी जातीने लक्ष घालून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुमच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणू, असं आश्वासन शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना दिलं.
राजू शेट्टी यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी यावेळी अजित पवार यांनं दिलं. केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी आजची भेट असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. तसंच या कायद्यावर महाविकास आघाडी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असं राजू शेट्टी अजित पवार यांना म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते आणि हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे राहील. शेतकरी हिताचे पाऊल उचलण्यात सरकार मागे हटणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेवेळी शिष्टमंडळाच्या नेत्यांना दिलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या भेटीच्या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, प्रतिभा शिंदे, एस. व्ही. जाधव, अशोक ढवळे, नामदेव गावडे, सुभाष लोमटे, किशोर ढमाले, सीमा कुलकर्णी, सुभाष काकस्ते, उमेश देशमुख, शकील अस्मेद आदी मान्यवर होते.
आज श्रीमती मेधा पाटकर, श्री. राजू शेट्टी यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मत मांडले, तसेच राज्यशासनाने याबाबतीत ठोस भूमिका मांडावी असा आग्रह धरला. मा. मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन विविध संघटनांच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांना दिले, असं ट्विट करुन पवारांनी भेटीचा तपशील सांगितला.
आज श्रीमती मेधा पाटकर, श्री. राजू शेट्टी यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मत मांडले, तसेच राज्यशासनाने याबाबतीत ठोस भूमिका मांडावी असा आग्रह धरला. pic.twitter.com/CopvIj6Fq1
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 29, 2021
(Raju Shetti meet Sharad pawar And Ajit pawar Over Agriculture law)
हे ही वाचा :
शरद पवार नाराज या चर्चेला अर्थ नाही, महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणारच, संजय राऊतांचा दावा
सांगली, जळगावनंतर भाजपला अजून एक धक्का, अहमदनगर महापालिकेत महाविकास आघाडी पॅटर्न