मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये; राजू शेट्टींची खोचक टीका

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. (raju shetti slams pm narendra modi over farmer agitation)

मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये; राजू शेट्टींची खोचक टीका
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 5:14 PM

कोल्हापूर: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारला बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं आहे. पण सरकारने शेतकऱ्याच्या रक्ताने स्वत:चे हात रंगवून घेऊ नये, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये, असं राजू शेट्टी म्हणाले. (raju shetti slams pm narendra modi over farmer agitation)

प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी ही टीका केली. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या चारही बाजूंना वेढा घातला आहे. लाखो शेतकरी हजारो वाहने घेऊन दिल्लीत आले आहेत. त्यांची दिल्लीतून परत जाण्याची मानसिकता नाही. हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाच्या किंवा संघटनेच्या हातात राहिलेलं नाही. शेतकऱ्यांचा हा रोष कमी करायचा असेल तर कृषी कायदे मागे घेतले पाहिजे, असं शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांना डिवचू नये

शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी त्यांना कायदेशीर ग्वाही दिली पाहिजे, असं सांगतानाच सर्वस्तरातील लोक दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. त्यांना डिवचू नये. केंद्र सरकारचे लक्षण ठिक दिसत नाही. त्यांना हे आंदोलन मोडीत काढायचं आहे. त्यासाठी बळाचा वापर करायचा आहे. पण सरकारने शेतकऱ्यांच्या रक्ताने हात रंगवून घेऊ नये. मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये, असं राजू शेट्टी म्हणाले.

भाजपला सत्ता गमवावी लागली होती

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर या आंदोलनाचा उद्रेक होऊ शकतो. त्याची प्रतिक्रिया देशभर उमटू शकते, असं सांगतानाच मध्य प्रदेशात 2017 रोजी शेतकऱ्यांवर गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाजपला तीन राज्यातील सत्ता गमवावी लागली होती. सरकारने हे विसरू नये. या सरकारने आता अदानी आणि अंबानी यांच्या घरात तेवढं पाणी भरायचं शिल्लक बाकी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दानवे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनावर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. दानवे यांची टीका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. केंद्रीय मंत्र्याकडे सर्व माहिती असते. तरीही त्यांनी या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा बेछूट आरोप केला. अशा नेत्याला मतदान केल्याचं जालन्यातील शेतकऱ्यांना तरी पटतं का? असा सवालही त्यांनी केला. (raju shetti slams pm narendra modi over farmer agitation)

संबंधित बातम्या:

नाशिक पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती, राऊतांचा विश्वासू नेता महानगरप्रमुख

LIVE UPDATES : केंद्राने 30 हजार 537 कोटी अजून दिलेले नाहीत : अजित पवार

शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षांची बंदूक : पंतप्रधान मोदी

(raju shetti slams pm narendra modi over farmer agitation)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.