Breaking : राजू शेट्टींचे डोळे पाणावले! आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर जोरदार हल्लाबोल, स्वाभिमानीतून हकालपट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वत: त्याबाबत घोषणा केलीय.

Breaking : राजू शेट्टींचे डोळे पाणावले! आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर जोरदार हल्लाबोल, स्वाभिमानीतून हकालपट्टी
आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी, राजू शेट्टींची घोषणाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 10:55 PM

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) एकमेव आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी स्वत: त्याबाबत घोषणा केलीय. शेट्टी यांनी आपल्या भाषणात देवेंद्र भुयार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र भुयारबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला असेल तर अशी घाण आमच्या संघटनेत राहू शकत नाही, असा घणाघात शेट्टी यांनी केलाय. आजपासून देवेंद्र भुयारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध नाही. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी घोषणा शेट्टी यांनी केलीय. इतकंच नाही तर राजू शेट्टी यांनी भुयार यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात हल्ला चढवलाय.

राजू शेट्टी भावूक, भुयार यांच्यावर हल्लाबोल

देवेंद्र भुयारबद्दल बोलताना राजू शेट्टी भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर त्यांचे डोळे पाणावले. देवेंद्र भुयारबद्दल माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला असेल तर असली घाण आमच्या संघटनेत राहू शकत नाही. त्याला संधी द्यायची का? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. मी माझ्या कष्टाचा पैसा एका चोराला दिला याचं दु:ख वाटतं. मी माझं घर विकलेले पैसे या हरामखोराला दिले. अजित पवार यांचे फोटो देवेंद्र भुयारच्या बॅनरवर दिले. देवेंद्रसाठी मी जेव्हा अजित पवार यांना तिकीट मागत होतो तेव्हा अजित पवार म्हणाले की फडतूस माणसासाठी तुम्ही जागा मागत आहात. विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मी याला संधी दिली. मी तुमची माफी मागतो, असं शेट्टी यावेळी म्हणाले.

‘सामान्य माणसाचा विश्वासघात केला, लाज वाटायला हवी’

विदर्भातून पोरगा निवडला होता तो बिनकामी निघाला. देवेंद्रला वाटत असेल मोठा झालो. त्याला शिंगं फुटली आहेत. सामान्य माणूस तुझ्यासोबत होता. लाज वाटली पाहिजे तुला, सामान्य माणसाचा विश्वासघात केला. देवेंद्रकडून खूप अपेक्षा होत्या. मी तुमची माफी मागतो. मी चुकीच्या माणसाच्या मागे उभा राहतो. मी देवेंद्र भुयारची तडीपारी मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं की तुमचं शर्ट फाडेन. मोदींचा विकास हरवला तसा तुमचा विकास कुठं आहे. कोटी-कोटीच्या गप्पा मारून विकास होत नसतो. विकास पाहायचा असेल तर कोल्हापूरला या. ठेकेदाराकडून टक्के मिळतात म्हणून कोटी-कोटी आणतो हा विकास नाही. आता तुम्ही देवेंद्रला निवडणुकीला पैसे देणार का? असा सवालही राजू शेट्टी यांनी कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांना केला.

इतर बातम्या :

Breaking : ‘शरीरात चुकीचं औषध टाकून मला संपवण्याचा डाव होता’, नितेश राणेंचा गंभीर आरोप; ‘कलानगर’चाही उल्लेख!

परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणांचा तपास CBI कडे जाणार! खासदार Sanjay Raut म्हणतात…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.