Raju Shetty : ऊस शेतीवर शरद पवारांनी बोलनं हे अत्यंत दुर्दैवी; राजू शेट्टींचे शरद पवारांना प्रत्युत्तर
सोलापूर : महाविकास आघाडी सरकार धोरणात्मक निर्णय घेताना दिसत नसून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. तसेच आपल्याला विचारात घेतले नाही. असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आपली खदखद मांडली. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधून आपण बाहेर पडत असल्याचे कोल्हापूरात जाहीर केले. त्यानंतर त्यांनी महाविकास […]
सोलापूर : महाविकास आघाडी सरकार धोरणात्मक निर्णय घेताना दिसत नसून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. तसेच आपल्याला विचारात घेतले नाही. असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आपली खदखद मांडली. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधून आपण बाहेर पडत असल्याचे कोल्हापूरात जाहीर केले. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील लक्ष केले आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी पवार यांच्या, ऊस हे तसे आळशी माणसांचे पीक आहे, या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. तसेच त्यांना शेट्टींनी शरद पवारां यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही ओळखलेच नाही असे म्हटले आहे.
12 साखर कारखाने कसे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला ऊस पट्ट्याकडे पाहिले की चिंता वाटते. ऊस हे तसे आळशी माणसांचे पीक आहे असे म्हटले होते. त्यावर आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीकेचा आसूड ओढला अहे. यावेळी ऊस शेती आळशी असेल तर तुमच्या नातवांचे 12 साखर कारखाने कसे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याचबरोबर ऊस शेती करताना शेतकऱ्याला किती काबाड कष्ट करावे लागते हे सांगत पवारांना उत्तर दिले आहे.
तसेच ते म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पवारांनी चुकीचे आळखे. पवार हे विसरत आहेत की, या आळशी ऊस उत्पदक शेतकऱ्यांच्या जीवावर महाराष्ट्राची कारखानदारी उभी राहिली आहे. कारखानदारीतून होणाऱ्या भ्रष्टाचारावर राजकारणासाठी पैसा उपलब्ध होतोय असेही ते म्हणाले.
पवारांना उपरोक्त टोला
त्याचबरोबर सहकारातील विविध पदावर बसलेले लोक बांडगुळासारखे वाढत आहेत. त्यांचा मूळ पोशिंदा ऊस उत्पादक शेतकरी असल्याचे त्यांनी सांगितले. आणि जर तुम्ही त्यालाच जर आळशी म्हणत असाल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. शरद पवार साहेब दहा वर्षे कृषीमंत्री होते त्यांच्या हे लक्षात यायला हवे होते. असा उपरोक्त टोला ही त्यांनी लागावला आहे.
तसेच पवार यांच्या ऊस शेतीच्या वक्तव्यावर बोलताना, ऊस हे एकमेव पीक आहे ज्याला हमीभावाचे सरंक्षण आहे. मात्र बाकीच्या शेतीमालाचा हमीभाव हा कागदावर राहतो. प्रत्यक्ष कमी दराने विकला तो जातो. त्यामुळे ऊस हा जास्त उत्पादन देत नसला तरी शाश्वत उत्पन्न देणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी पवार साहेबांनी या उपाय योजना आमंलात आणुन ऊस उत्पादकाला लवकरात लवकर धडा शिकवावा असे म्हटले आहे.
राजू शेट्टींचे शरद पवारांना फेसबुक पोस्टवरून शरद पवारांना प्रत्युत्तर
आळशी ऊस उत्पादकांची लक्षणे-
1) जमिनीची नांगरट करून सऱ्या सोडणे 2) वाकुरी मारणे 3) हिरवळीचं खत घेऊन ताग अथवा धैचा पेरणे 4) तीन पाण्याच्या पाळया देऊन हिरवळीचं खत गाडणे 5 लागणीसाठी ऊस तोडणे बी मांडणी आणि लागणी पुर्वीचा खताचा एक डोस टाकणे 6) पाण्याबरोबर लागण करणे 7) दोन वेळा आळवणी करणे 8) तीन वेळा भांगलणे 9) तीन वेळा रासायनिक खते, कीटकनाशक आणि फवारणी घेणे 10) बाळ भरणी करणे 11) जेटा मोडणे,खताचे तीन डोस घेणे 12) भरणी करणे 13) दर पंधरा दिवसांनी रात्री अपरात्री उसाला पाणी देणे 14) उसाच्या कर्जासाठी बैंक सोसायटी कडे हेलपाटे मारणे 15) उसाच्या नोंदीसाठी चिटबॉयला खुश करणे 16) ऊसाच्या तोडीसाठी कारखान्याचा संचालक ते चिटबॉय यांच्या हाता पाया पडणे 17) चिटबॉय मुकादमाला धाब्यावर पर्यटनाला घेऊन जाणे 18) ऊस तुटल्यानंतर वेळेवर FRP चे पैसे मिळावेत म्हणून मोर्चे काढणे 19) केसेस अंगावर घेणे 20) कोर्टाचे हेलपाटे मारणे
आळशी ऊस उत्पादकाला वठणीवर आणण्यासाठी उपाय योजना –
1) या आळश्यांच्या जिवावर जिल्हा बँकेचे चेअरमन संचालक,कारखान्याचे संचालक चेअरमन यासारखी बांडगुळ पोसुन VSI सारखा पांढरा हत्ती सांभळणे 2) या आळशांनी पै पै गोळा करुन ऊभारलेला सहकारी तत्वावरचा कारखाना मोडून खाणे 3) एफ आर पी चे शक्य तेवढे तुकडे करुन या आळशांना देशोधडीला लावणे. 4) कारखाना परिसरातील ऊस शिल्लक ठेवून कारखाना गाळप बंद करणे, काटा मारणे , उता-यात फेरफार करणे. 5) एकरकमी एफ आर पी देणा-या कारखान्याच्या कार्यक्रमात जाऊन एफ आर पी दोन टप्प्यात द्यावी लागेल अशी खंत व्यक्त करणे.