Rajya Sabha 2022: तूर्तास मतदानाची परवानगी नाहीच! नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाचा झटका, पुन्हा अर्ज करणार?

राज्यसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रकिया दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

Rajya Sabha 2022: तूर्तास मतदानाची परवानगी नाहीच! नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाचा झटका, पुन्हा अर्ज करणार?
नवाब मलिकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 11:55 AM

मुंबई : आज राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election News) मतदान पार पडतंय. मात्र या मतदानासाठीचा अधिकार नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मिळणार का, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. याप्रकरणी गुरुवारी पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली होती. पीएमएलने न्यायालयानं मतदानासाठी कारागृहाबाहेर जाण्यास अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार देतं का?, याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह भाजपचंही लक्ष लागलं होतं. अखेर उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी तूर्तास नाकारली आहे. हा महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जातोय.

नवाब मलिकांना मतदान करण्यास हायकोर्टाने तू्र्तास परवानगी नाकारलीय. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. दुपारी चार वाजेपर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान सुरू राहणार आहे. दरम्यान, नव्याने अर्ज करून नवाब मलिक यांच्या मागणीवर सुनावणी केली जाईल, असं हायकोर्टानं म्हटलंय.

पुन्हा अर्ज करण्यास सांगितलं

  1. मंत्री नवाब मलिकांना मतदानाची तूर्तास परवानगी नाहीच
  2. मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टाकडून कायम ठेवला
  3. मात्र नवाब मलिकांना याचिकेत सुधारणा करून पुन्हा दाद मागण्याची परवानगी
  4. याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी
  5. थोड्या वेळात नव्या याचिकेसह पुन्हा होणार सुनावणी

गुरुवारी नाकारली होती परवानगी!

दरम्यान, गुरुवारी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए कोर्टानं मतदानासाठी परवानगी नाकारली होती. कोठडीतून बाहेर जाऊन मतदान करता येणार नाही, असं कोर्टानं म्हटलं होतं. या निर्णयाला आव्हान देत अखेर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

हे सुद्धा वाचा

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरशीचीच लढत होते आहे. संजय पवार विरुद्ध धनंजय महाडित असा सामना रंगलाय. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक आमदाराचं मत हे महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने दिलेला निर्णय हा महत्त्वपूर्ण मानला जातोय.

थोडक्यात पण महत्त्वाचं….

  1. राज्यात राज्यसभेसाठी एकूण 6 जागा
  2. 6 जागांसाआठी 7 उमेदवार रिंगणात
  3. संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापढी, पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे – यांचा विजय जवळपास निश्चित
  4. सहाव्या जागेसाठी शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत

कोणाकडे किती आमदार?

  1. शिवसेना 55
  2. राष्ट्रवादी 53
  3. काँग्रेस 44
  4. भाजप 106
  5. छोटे पक्ष 16
  6. अपक्ष 13
  7. बविआ 3
  8. सपा 2
  9. एमआयएम 2
  10. प्रहार जनशक्ती 2
  11. मनसे 1
  12. माकप 1
  13. स्वाभिमानी 1
  14. रासप 1
  15. जनसुराज्य 1
  16. शेकाप 1
  17. क्रांतिकारी शेतकरी 1
  18. एकूण – 16
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.