AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: जिकडे ‘ठाकूर’, तिकडे ‘शोले’, आम्ही मतदानाची आधीच गाठलं तर फिर वो क्या बोले?

आज ते सकाळी हितेंद्र ठाकूर मतदानासाठी बाहेर पडले नाहीत. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माझ्या आज नातीचा वाढदिवस आहे. घरची काम सोडून जायचं का ? उशीरा गेलं म्हणून काय होतंय.

Rajya Sabha Election 2022: जिकडे 'ठाकूर', तिकडे 'शोले', आम्ही मतदानाची आधीच गाठलं तर फिर वो क्या बोले?
आमची 6 उमेदवारांना 6 मतं, संजय राऊतांना कसं कळलं? हितेंद्र ठाकूर यांचा सवालImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 1:35 PM

मुंबई – मागच्या दोन दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) निवडणुकीवर कलगीतुरा चांगलाचं रंगला आहे. राज्यसभेत आपले उमेदवार अधिक कसे निवडून येतील यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करीत आहे. मागच्या दोन दिवसांपासन प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना मतदानाची प्रक्रिया समजून सांगत आहे. तसेच सकाळी राष्ट्रवादीने मतदानाचा कोटा वाढल्याने महाविकास आघाडीत बिघाडी असल्याची सुत्रांनी माहिती दिली होती. त्यानंतर राज्यातलं राजकारण अधिक तापलं होतं. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार एकदम उशिरा घरातून बाहेर पडले. क्षितिज ठाकूर (kshitij thakur), हितेंद्र ठाकूर (hitendra thakur), राजेश पाटील हे कोणाला मतदान करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

माझ्या नातीचा वाढदिवस असल्याने लवकर गेलो नाही

आज ते सकाळी हितेंद्र ठाकूर मतदानासाठी बाहेर पडले नाहीत. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माझ्या आज नातीचा वाढदिवस आहे. घरची काम सोडून जायचं का ? उशीरा गेलं म्हणून काय होतंय. तसेच कोणत्या पक्षाला मतदान करणार हे त्यांना अद्याप स्पष्ट केलेलं नाही. तसेच ते आता गोरेगाव पर्यंत पोहोचले आहेत. दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान मतदान करणार आहेत. ज्यावेळी उमेदवार निवडून येईल त्यावेळी मतदान कुठे केले हे देखील समजेल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. काही वेळात ते मतदानासाठी विधानभवनात दाखल होणार आहेत. आत्तापर्यंत सर्वपक्षीय 260 आमदारांचं मतदान झालं आहे. महाराष्ट्रातले सत्ताधारी आणि विरोधकांनी आमचे उमेदवार निवडून येतील अशी शक्यता व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

बहुजन विकास आघाडी तीन मतांना विशेष महत्त्व

क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील हे राज्यसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली होती. परंतु त्यांनी तशी अधिकृत घोषणा केलेली नाही. आज सकाळपासून सगळ्या पक्षाच्या आमदारांनी मतदान केलं आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने छोट्या पक्षांची तसेच अपक्षांची मतेही मोठी झाली आहेत.

यामध्ये तीन आमदारांचा पाठिंबा असलेल्या बहुजन विकास आघाडीला विशेष महत्त्व निर्माण झाले आहे.

भारत - पाकिस्तानमधल्या डिजीएमओंच्या चर्चेला सुरुवात
भारत - पाकिस्तानमधल्या डिजीएमओंच्या चर्चेला सुरुवात.
भारत-पाकच्या DGMOच्या बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी काय झाली चर्चा
भारत-पाकच्या DGMOच्या बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी काय झाली चर्चा.
इस्त्रोचे 10 उपग्रह बनले लष्कराचे डोळे, दिली पाकच्या हालचालींची महिती
इस्त्रोचे 10 उपग्रह बनले लष्कराचे डोळे, दिली पाकच्या हालचालींची महिती.
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून, 6 दिवसांच्या प्रवासात कुठे फिरता येणार?
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून, 6 दिवसांच्या प्रवासात कुठे फिरता येणार?.
ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 जवानांना वीरमरण; पत्रकार परिषदेत लष्कराची माहिती
ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 जवानांना वीरमरण; पत्रकार परिषदेत लष्कराची माहिती.
भारताकडून पाकच्या एअरबेसवर हल्ला, सॅटेलाईटचे फोटो समोर, तुम्ही पाहिले?
भारताकडून पाकच्या एअरबेसवर हल्ला, सॅटेलाईटचे फोटो समोर, तुम्ही पाहिले?.
बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडायला 25 कोटी खर्च
बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडायला 25 कोटी खर्च.
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट.
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी.
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.