Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajyasabha Election 2022: विधानभवनात मतदानाला हजर रहा… शिवसेना आमदारांना पक्षाचा व्हिप जारी

Rajyasabha Election 2022: शिवसेनेतर्फे सर्व आमदारांना व्हिप जारी. राज्यसभेच्या मतदानाला हजर राहून पक्षादेशानुसार, मतदान करण्याचे आदेश

Rajyasabha Election 2022: विधानभवनात मतदानाला हजर रहा... शिवसेना आमदारांना पक्षाचा व्हिप जारी
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 1:01 PM

मुंबईः राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष खबरदारी घेत असून शिवसेनेनं आपल्या आमदारांना व्हिप (ShivSena Whip) जारी केला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी व्हिप जारी केला आहे. व्हिप हा पक्षाचा आदेश असून यानुसार, शिवसेना आमदारांना मतदान करण्यास सांगण्यात आलं आहे. 10 जून रोजी राज्यसभेसाठी महाराष्ट्र विधान भवनात मतदान होणार आहे. याकरिता विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात सकाळी आठ वाजता सर्व आमदारांनी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, याची खबरदारी शिवसेनेकडून घेतली जात असून कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मविआतील आमदारांची महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर आज शिवसेनेतर्फे त्यांच्या आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या (व्हिप) पक्षादेशात काय सूचना?

शिवसेनेनं जारी केलेल्या व्हिपमध्ये पुढील सूचना देण्यात आली आहे.- राज्यसभा निवडणुकीचे मतदान शुक्रवार दिनांक 10 जून 2022 रोजी सकाळी 9ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधानभवन मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून सदस्यांनी शुक्रवारी दिनांक 10 जून 2022 रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष 214, विधानभवन मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरता सकाळी 8 वाजता उपस्थित रहावे. आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश आणि सूचनेप्रमाणे मतदान करायचे आहे. अतः शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांना कळवण्यात येते की, सदस्यांनी उपरोक्त दिवशी वेळेवर उपस्थित राहून पक्षाने दिलेल्या आदेशानुसार, मतदान करावे, असा पक्षादेश आहे.

ShivSena Whip

हे सुद्धा वाचा

व्हिप पाळला नाही तर…?

व्हिप हा संबंधित पक्षातील सदस्यांना पक्षाद्वारे दिलेला आदेश असतो. याद्वारे आमदारांवर नियंत्रण ठेवलं जातं. विधानसभेत एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर मतदान करायचं असेलस तर त्याबाबतचा आदेश व्हिपमार्फत जारी करण्यात येतो. कार्यकारी विधीमंडळात पक्षातील शिस्त सुनिश्चित करणे हा यामागील हेतू असतो. एखाद्या आमदाराने पक्षादेश धुडकावून लावत मतदान केले तर त्या व्यक्तीचे सभासदत्व धोक्यात येऊ शकते. अथवा तो अपात्र होण्याचा धोका असतो. त्याच्यावर पक्षाची शिस्त भंग केल्या प्रकरणी कारवाई होते, तसेच त्याला पदही गमवावे लागू शकते.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.