Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत मतदानाची परवानगी द्या, अनिल देशमुखांचा मुंबई सत्र न्यायालयात अर्ज

महाविकास आघाडीचे दोन आमदार सध्या जेलमध्ये आहेत. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा समावेश आहे. अनिल देशमुख यांनी आपल्याला राज्यसभा निवडणुकीत मतदानाला परवानगी द्यावी म्हणून मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत मतदानाची परवानगी द्या, अनिल देशमुखांचा मुंबई सत्र न्यायालयात अर्ज
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 8:22 PM

मुंबई : राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) आता बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. कारण राज्यसभेच्या 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेना अर्थात महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे संजय पवार (Sanjay Raut) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. तर भाजपनेही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना (Dhananjay Mahadik) मैदानात उरवल्यामुळं चुरस वाढली आहे. अशावेळी महाविकास आघाडी आणि भाजपला आपल्या आमदारांसह अपक्ष आणि छोट्या पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे दोन आमदार सध्या जेलमध्ये आहेत. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा समावेश आहे. अनिल देशमुख यांनी आपल्याला राज्यसभा निवडणुकीत मतदानाला परवानगी द्यावी म्हणून मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

10 जून रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. एकूण 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी आणि भाजपकडून एकमेकांना विधान परिषदेची एक जागा सोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे ता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या जेलमध्ये असलेल्या दोन आमदारांना मतदान करता यावं यासाठी न्यायालयात धाव घेणार आहे. कोर्ट या आमदारांना मतदानासाठी परवानगी देतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आकडेवारीचं गणित काय?

आकडेवारीचं गणीत पाहिलं तर पहिल्या पसंतीची मते दिल्यावर शिवसेनेकडे 13, राष्ट्रवादीकडे 12, काँग्रेसकडे 2 आणि इतर आणि अपक्ष 16 मते उरतात. म्हणजे आघाडीकडे एकूण शिल्लक 43 मते शिल्लक राहतात. तर भाजपकडे 22 आणि सहयोगींचे 6 अशी 30 मते शिल्लक राहतात. गणितानुसार भाजपला आणखी 12 मतांची गरज आहे.

हे सुद्धा वाचा

छोट्या पक्षांवर मदार, कुणाकडे किती आमदार?

  • बहुजन विकास आघाडी – 3
  • एमआयएम – 2
  • प्रहार जनशक्ती पक्ष – 2
  • समाजवादी पार्टी – 2
  • मनसे – 1
  • राष्ट्रीय समाज पक्ष – 1
  • क्रांतीकारी शेतकरी पक्ष – 1
  • जनसुराज्य शक्ती – 1
  • शेतकरी कामगार पक्ष – 1
  • कम्युनिस्ट पक्ष – 1

महाविकास आघाडीचे आमदार फोडण्याचे काम सुरू – राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. सर्व अपक्ष आमदार महाविकास आघाडीशी जोडले गेले आहेत. आता या आमदारांना फोडण्याचे, त्यांना फूस लावण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापरही सुरू झाला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही उमेदवार मागे घेणार आहोत, अशा चर्चा कुठून सुरू झाल्या? याचे सूत्रधार कोण आहेत? आम्हाला माहीत आहे. आता चर्चा थांबल्या आहेत. आमचे उमेदवार रिंगणात आहेत. निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागणार आहे, असा दावाही राऊत यांनी केलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.