RajyaSabha election मध्ये आज एका मोठ्या पक्षाचा होऊ शकतो गेम, 8 आमदाराच्या अनुपस्थितीने खळबळ

राज्यसभेत एका उमेदवाराच्या विजयासाठी 37 आमदारांच्या प्राथमिक मताची आवश्यकता आहे. आठव्या उमेदवाराच्या विजयासाठी भाजापकडे अतिरिक्त 29 मत आहेत. आठवा उमेदवार निवडणूक आणण्यासाठी भाजपाला आठ मतांची आवश्यकता आहे. डिनरच्या कार्यक्रमाला बरोबर आठ आमदारच अनुपस्थित होते.

RajyaSabha election मध्ये आज एका मोठ्या पक्षाचा होऊ शकतो गेम, 8 आमदाराच्या अनुपस्थितीने खळबळ
Politics
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 9:55 AM

RajyaSabha election | उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात उतरले आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी 9 वाजता मतदान सुरु होईल. संध्याकाळपर्यंत निकाल घोषित होईल. भाजपाचे आठ आणि सपाचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विधानससभेतील संख्याबळाच्या आधारावर भाजपाचे सात आणि सपाच्या दोन राज्यसभा उमेदवारांचा विजय पक्का आहे. 10 व्या जागेसाठी भाजपा आणि सपामध्ये सामना आहे. त्यासाठी दोन्ही पक्ष फोडाफोडीच राजकारण करत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांना राजकीय संदेश द्यायचा आहे.

राज्यसभेच्या 10 व्या जागेसाठी सपा आणि भाजपा दोघेही, मतांची जुळवाजुळव करत आहेत. सोमवारी रात्री सपाने ‘डिनर डिप्लोमेसी’च आयोजन केलं होतं. राज्यसभेची तिसरी जागा जिंकण हा यामागे उद्देश होता. भाजपाने एनडीए आमदारांची बैठक घेऊन आठवी जागा जिंकण्याचा प्रयत्न केला. एनडीएच्या बैठकीला सुभासपाचे दोन आमदार पोहोचले नाहीत. सपाच्या डिनरला आठ आमदार अनुपस्थित होते. दोन्ही गोटात टेन्शन आहे. भाजपा आपला आठवा आणि सपासमोर तिसर उमेदवार निवडणून आणण्याच आव्हान आहे.

भाजपाचा आठवा उमेदवार कोण?

सपाकडून जया बच्चन, रामजीलाल सुमन आणि आलोक रंजन मैदानात आहेत. भाजपाकडून आरपीएन सिंह, चौधरी तेजवीर सिंह, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, सुधांशु त्रिवेदी, साधना सिंह, नवीन जैन आणि संजय सेठ मैदानात आहेत. प्राधान्यक्रमाच्या आधारावर भाजपाने संजय सेठ यांना आपला आठवा उमेदवार बनवलय. पण सपाने प्राधान्य क्रमाच्या आधारावर आपल्या तिसऱ्या उमेदवाराच नाव जाहीर केलेलं नाहीय. वोटिंगच्या आधी विधिमंडळ कक्षात आमदारांची बैठक होईल. तिथे अखिलेश यादव प्राधान्यक्रमाच्या आधारावर राज्यसभा उमेदवारांची नाव सांगितलं.

जितकी मत हवी तितके आमदार अनुपस्थित

राज्यसभेत एका उमेदवाराच्या विजयासाठी 37 आमदारांच्या प्राथमिक मताची आवश्यकता आहे. सपाकडे 108 आमदार आहेत. पार्टीचे दोन उमेदवार जिंकू शकतात. तिसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी तीन मतांची आवश्यकता आहे. भाजपा एनडीएमधील सहकाऱ्यांच्या साथीने राज्यसभेच्या सात जागा जिंकू शकते. पण आठव्या उमेदवाराच्या विजयासाठी भाजापकडे अतिरिक्त 29 मत आहेत. आठवा उमेदवार निवडणूक आणण्यासाठी भाजपाला आठ मतांची आवश्यकता आहे. सपाच्या डिनरच्या कार्यक्रमाला बरोबर आठ आमदारच अनुपस्थित होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.