Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची त्रिमूर्ती! शेलार, लाड आणि महाजनांवर मोठी जबाबदारी

ज्यात घोडेबाजाराला ऊत येणार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर शिवसेना आपले आमदार सुरक्षित स्थळी हलवणार असल्याची माहिती मिळतेय. तर भाजपकडून 'त्रिमूर्तीं'कडे मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची त्रिमूर्ती! शेलार, लाड आणि महाजनांवर मोठी जबाबदारी
प्रसाद लाड, गिरीश महाजन, आशिष शेलारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 10:06 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळतेय. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरच्या संजय पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. तर भाजपनंही कोल्हापूरच्यात धनंजय महाडिकांना (Dhananjay Mahadik) उमेदवार दिलीय. या पार्श्वभूमीवर राज्यात घोडेबाजाराला ऊत येणार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर शिवसेना आपले आमदार (Shivsena MLA) सुरक्षित स्थळी हलवणार असल्याची माहिती मिळतेय. तर भाजपकडून ‘त्रिमूर्तीं’कडे मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला 14 मते कमी पडत आहेत. ही मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपकडून आमदार आशिष शेलार, आमदार गिरीश महाजन आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळतेय. भाजपसोबत असलेल्या अपक्षांसह भाजपचे संख्याबळ 112 होत आहे. यात भाजपचे 2 उमेदवार निवडून येऊन भाजपकडे 28 मते शिल्लक राहतात. अशावेळी तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपला 14 मतांची गरज आहे. या 14 मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी भाजपच्या या त्रिमूर्तींवर सोपवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

शिवसेना आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवणार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानावर शिवसेनेसह अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. राज्यसभा निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेना सावधगिरी बाळगत असल्याचं पाहायला मिळतंय. वर्षावर बैठक पार पडल्यानंतर तिथूनच सर्व आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपनंही उमेदवार दिल्यामुळे चुरस वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपला 13 तर महाविकास आघाडीला 4 आमदारांची गरज

महाविकास आघाडी आणि भाजपा दोघांकडेही त्यांची स्वताचा सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मते नाहीत. आघाडीला 4 आमदारांची तर भाजपाला 13 आमदारांची गरज आहे. अशा स्थितीत कोण नेमकं कुणाला हात देतं, यावर ही सगळी निवडणूक रंगणार आहे. 10 जूनला मतदान होईपर्यंत याचा सस्पेन्स कायम राहणार आहे. यात आता किती घोडेबाजार होतो, हे पाहावं लागणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.