Rajyasabha Election Results 2022: संजय पवारांचा गेम कुठं झाला? आघाडीतल्या या 5 नेत्यांचे हे व्हीडीओ बघा, तुम्हाला उत्तर सापडेल…

Rajyasabha Election Results 2022 : संजय पवार यांचा पराभव नेमकं काय सांगतो, त्यांच्या पराभवाची कारणं काय? जाणून घेऊयात...

Rajyasabha Election Results 2022: संजय पवारांचा गेम कुठं झाला? आघाडीतल्या या 5 नेत्यांचे हे व्हीडीओ बघा, तुम्हाला उत्तर सापडेल...
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 11:25 AM

मुंबई : देशाची संसद साऱ्यांनाच खुणवत राहाते. त्या संसद व्यवस्थेचा आपण एक भाग असावं हे स्वप्न प्रत्येक राजकारणी मनाशी बाळगून असतो. तसंच स्वप्न कट्टर शिवसैनिक संजय पवार (Sajay Pawar) यांनीही पाहिलं. शिवसेनेसह (Shivsena) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने (NCP) ते सत्यात उतरवण्यासाठी जीवाचं रान केलं. पण तरीही संजय पवारांचं हे स्वप्न अधुरं का राहिलं? संजय पवारांचा पराभव का झाला? कोणते पाच मुद्दे संजय पवारांच्या पराभवातील मैलाचा दगड आहेत? तेच जाणून घेऊयात पाच मुद्द्यांसह व्हीडिओच्या माध्यमातून…

1. उद्धव ठाकरेंचं प्रत्यक्ष मैदानात न दिसणं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत असा आरोप विरोधी फक्षाकडून वारंवार करण्यात येतो. संजय राऊतांसह शिवसेनेचे इतर नेते निवडणुकीसाठी कंबर कसून मतदानात दिसत होते. मात्र या सगळ्यात मुख्यमंत्री मात्र दिसले नाहीत. त्याचा फटका शिवसेनेसह महाविकास आघाडीला बसल्याचं राजकीय वर्तुळात चर्चिलं जातंय.

हे सुद्धा वाचा

2. फक्त निवडणुकीपुरताच अपक्षांचा विचार

अपक्ष आमदार स्वत:च्या कर्तृत्वावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर निवडून येतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याची तशी गजर नसते. पण राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीवेळी त्यांच्याशी हातमिळवणी करण्यासाठी गेलेल्या पक्षांवर विश्वास ठेवून त्यांच्याशी तडजोड करावी की नाही, असा प्रश्न या आमदारांसमोर उभा ठाकतो. पण या अपक्ष आमदारांची आठवण केवळ निवडणुकी पुरती ठेवली जात असल्याने या आमदारांमध्ये नाराजीचा सूर असतो. त्याचाच फटका या निवडणुकीत बसलेला पाहायला मिळाला. अन् संजय पवारांचा पराभव झाला.

3. बच्चू कडू नाराज

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू महाविकास आघाडीवर नाराज होते. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. मी मतदान महाविकास आघाडीलाच करणार आहे. पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला हवेत, असं बच्चू कडू म्हणाले. त्यांची नाराजी हा संजय पवारांच्या पराभवातील महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो.

4. सपा-एमआयएमचा शेवटच्या क्षणी पाठिंबा

सपा आणि एमआयएमचा पाठिंबा मिळवण्यास महाविकास आघाडीला उशीर झाला. अगदी ऐनवेळी सपा-एमआयएमचा पाठिंबा मिळाल्याने त्याचा परिणामही या निवडणुकीत पाहायला मिळाला.

5. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते नाराज

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्र्यावर नाराज होते. आमदारांचे प्रश्न सुट नसल्याचा त्यांचा आरोप होता. त्यांची नाराजी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितली. “ज्या आमदारांच्या जीवावर सरकार चालते त्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर आम्ही आमची भूमिका मांडायची कोणाकडे… माझी स्पष्ट भूमिका आहे, की मी माझ्या वैयक्तिक प्रश्नासाठी कधीही त्यांच्याकडे गेलो नाही आणि जाण्याचा प्रश्नही नाही. माझ्या तालुक्यातील जे काही विषय होते, त्यासंदर्भात गेलो होतो. मात्र माझे विषय सुटले नाहीत, असं दिलीप मोहिते टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले. पण असं जरी असेल तरी दिलीप मोहिते पाटील यांनी पक्षाच्या सुचनेप्रमाणे मतदान केलं.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...