RajyaSabha Election : शिवसेना संध्याकाळपर्यंत दुसरा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता, संभाजीराजे नाही तर कुणाला मिळणार संधी?

महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातील शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाला राज्यसभेची उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

RajyaSabha Election : शिवसेना संध्याकाळपर्यंत दुसरा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता, संभाजीराजे नाही तर कुणाला मिळणार संधी?
संभाजीराजे छत्रपती, उद्धव ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 5:02 PM

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रवेशाची ऑफर नाकारल्यात जमा आहे. कारण, उद्धव ठाकरे यांनी ‘शिवबंधन’ बांधण्यासाठी संभाजीराजे यांना आज ‘वर्षा’वर येण्यासाठी निरोप दिला होता. मात्र, दुपार उलटून गेल्यानंतरही संभाजीराजे वर्षाकडे फिरकले नाहीत. अशावेळी आज संध्याकाळी शिवसेना (Shivsena) आपल्या दुसऱ्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे शिवसेना उमेदवाराची घोषणा करतील. महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातील (Rural Area) शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाला राज्यसभेची उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मात्र, शिवसेनेकडून दुसरा उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली. तसंच संभाजीराजेंना शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफरही देण्यात आली. याबाबत उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात दोन बैठका पार पडल्या. तर शिवसेना नेते अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उदय सामंत यांनीही रविवारी संभाजीराजे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांचा निरोप देण्यात आला. मात्र, आज संभाजीराजे वर्षा बंगल्याकडे फिरकले नाहीत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी शिवसेना आज संध्याकाळी दुसरा उमेदवार घोषित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘शिवसेनेचा नाही तर शिवसेना पुरस्कृत उमेदवारी द्या’

उद्धव ठाकरे यांच्याकडून संभाजीराजे छत्रपतींना शिवसेना प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेत प्रवेश करा मग राज्यसभेची उमेदवारी जाहीर करु, अशी अट शिवसेनेकडून संभाजीराजेंना घालण्यात आल्याचं समजतं. मात्र, संभाजीराजे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी जाहीर करा किंवा शिवसेना पुरस्कृत उमेदवारी द्या, असं सांगितल्याचीही माहिती मिळतेय. त्यामुळे आता शिवसेना किंवा संभाजीराजे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

संभाजीराजेंचे गणित काय?

संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहण्याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. अपक्ष निवडणूक लढवून महाविकास आघाडी आणि भाजपची मते घेऊन राज्यसभेवर जाण्याचं त्यांचं गणित होतं. छत्रपतींच्या घराण्यातील असल्यामुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे राज्यसभेचा मार्ग सोपा होईल, असं संभाजीराजेंना वाटत होतं. मात्र, शिवसेनेने पक्षप्रवेशाची अट घातल्याने संभाजी राजेंच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. मात्र, असं असलं तरी शिवसेनेचा हा निर्णय भाजपच्याच पथ्यावर पडताना दिसत आहे. शिवसेनेने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्यास शेवटच्या क्षणी भाजप संभाजीराजेंना पाठिंबा देईल. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरेल. घोडेबाजारही होईल. आघाडीचे आमदार फुटले तर सरकार अस्थिर असल्याचा मेसेज जाईल. आणि आमदार नाही फुटले अन् संभाजीराजे पराभूत झाल्यास शिवसेनेमुळे छत्रपती घराण्याचा व्यक्ती पराभूत झाल्याचा मेसेज महाराष्ट्रात जाईल. प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा भाजप अस्मितेचा मुद्दा म्हणून पुढे आणू शकेल, असं सूत्रं सांगतात. शिवाय या खेळीमुळे शिवसेनेची दुसरी जागाही धोक्यात येऊ शकते, असा अंदाजही वर्तवला जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.