राकेश टिकैत मुंबईत दाखल, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीला राहणार उपस्थित
शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer leader Rakesh Tikayat) मुंबईमध्ये (mumbai) दाखल झाले आहेत. ते आज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
मुंबई: शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer leader Rakesh Tikait) मुंबईमध्ये (mumbai) दाखल झाले आहेत. ते आज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी 12 वाजता आझाद मैदानावर संयुक्त किसान मोर्चाची बैठक आहे. या बैठकीला ते संबोधित करणार आहेत. टिकैत यांच्याशी टीव्ही 9 च्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे. जोपर्यंत एमएसपी लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी टिकैत यांनी दिला.
दुपारी किसान मोर्चाची बैठक
आज दुपारी बारा वाजता आझाद मैदानावर संयुक्त किसान मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला टिकैत उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीमध्ये शेतकरी आंदोलनाची पुढील रणनिती ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या बैठकीनंतर टिकैत हे आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या आस्थि कलशाचे मुंबईमध्ये विसर्जन करणार आहेत. कृषी कायदे मागे घेण्यासोबतच शेतकऱ्यांच्या मालाला एमएसपी लागू करावी ही आमची प्रमुख मागणी होती. केंद्राने कृषी कायदे मागे घेतले आहेत, आता एमएसपी देखील लागू करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तसेच जोपर्यंत एमएसपी लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहाणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला देणार भेट
राकेश टिकैत हे गेल्या पंधरा दिवसांपासून आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला देखील भेट देणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच एसटी कामगारांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावावण्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
संबंधित बातम्या
कडाक्याच्या थंडीतही हर्षवर्धन पाटलांचे आंदोलन सुरूच; शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी