Raksha Khadse | बारामतीप्रमाणे रावरेमध्ये भावजय विरुद्ध नणंद सामना का? रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरुन नाराजी?
Raksha Khadse | रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे खासदार आहेत. भाजपाने पुन्हा एकदा रक्षा खडसे यांच्यावरच विश्वास दाखवलाय. रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर होताच, रावेर संदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आलाय.
Bjp Raver Lok Sabha Candidate (चंदन पूजाधिकारी) | भारतीय जनता पार्टीने काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवार आहेत. काही मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदारांच तिकीट कापलय, तर बहुतांश मतदारसंघात विद्यमान खासदारांनाच उमेदवारी दिलीय. ठराविक मतदारसंघात भाजपा कोणाला उमेदवारी देणार? याकडे राजकीय विश्लेषकांच लक्ष लागलं होतं. खासकरुन रावेरमध्ये. भाजपा रावेरमध्ये उमेदवार बदलणार अशी चर्चा होती. पण असं घडलं नाही. रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे खासदार आहेत. भाजपाने पुन्हा एकदा रक्षा खडसे यांच्यावरच विश्वास दाखवलाय. रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर होताच, रावेर संदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. खासकरुन शरद पवार गट सक्रीय झाला आहे. महाविकास आघाडीत रावेरची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. शरद पवार,एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात ही चर्चा झाली. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्याने शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्यात बैठक झाली. महाविकास आघाडीकडून रावेर लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा झाली. रक्षा खडसे एकनाथ खडसे यांच्या सून असल्याने रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याकडे लक्ष आहे. एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याबाबत देखील चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
रक्षा खडसे यांच्या नाराजीमुळे भाजपामधील एक गट नाराज
दरम्यान रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना तिकीट जाहीर झाल्याने रावेर लोकसभेसाठी भाजपामधील एक इच्छुक गट नाराज झाल्याची माहिती आहे. स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल सावळे यांचे तिकीट कापल्याने हा नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे. रावेरच्या भालोद इथे हजारो भाजपाचे कार्यकर्ते जमा होऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सामूहिक स्वाक्षरी मोहीम
भाजपचा राजीनामा या ठिकाणी देत आहोत, असं पत्र समोर आलं आहे. पत्रात प्रति बावनकुळे साहेब, आज रावेर लोकसभेची जागा जाहीर झाली. अमोल जावळे यांना डावलण्यात आलं, पुन्हा अन्याय झाल्याने लोकसभा मतदारसंघात आम्ही यापुढे भाजपाचे काम करणार नाही, अशी सामूहिक स्वाक्षरी मोहीम सुरू झाली आहे, अशी माहिती प्राथमिक मिळाली आहे.