Ayodhya | राम मंदिर उद्घाटनाच्या दोन दिवसआधी हिंदू सेनेच कृत्य, बाबर रोडच्या जागी लावले….
Ayodhya | सध्या देशात राम मंदिर उद्घाटनाचा मोठा उत्साह आहे. पण त्याआधी हिंदू सेनेने एक कृती केलीय. अयोध्येत सध्या रामललाच्या प्राण प्रतिष्ठेचे विधी सुरु आहेत. आता 500 वर्षानंतर अयोध्येत राम मंदिराच निर्माण त्याच स्थानावर होत आहे.
Ayodhya | एकाबाजूला अयोध्येत रामललाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी अनुष्ठान सुरु आहे. दुसऱ्याबाजूला दिल्लीच्या बाबर रोडच्या बोर्डवर अयोध्या मार्गचे पोस्टर चिकटवण्यात आले आहेत. हिंदू सेनेने शनिवारी दिल्लीच्या बाबर रोडच्या बोर्डवर अयोध्या मार्गचा पोस्टर चिकटवला. बाबर रोडसह अन्य मुगल शासकांशी संबंधित रस्त्यांची जी नाव आहेत, ती बदलण्यात यावीत, अशी मागणी याआधी सुद्धा हिंदू संघटनांनी केली आहे. अयोध्येत सध्या रामललाच्या प्राण प्रतिष्ठेचे विधी सुरु आहेत. त्या समयी हिंदू सेनेने पोस्टर चिकटवून पुन्हा एकदा रस्त्याच नाव बदलण्याची मागणी केली आहे.
मुगल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने अयोध्येत राम मंदिर पाडून त्याठिकाणी बाबरी मशीद बांधली होती, असं म्हटलं जातं. त्यानंतर बरेच संघर्ष झाले. त्यात अनेकांनी आपले प्राण गमावले. आता 500 वर्षानंतर अयोध्येत राम मंदिराच निर्माण त्याच स्थानावर होत आहे. रामललाच्या प्राण प्रतिष्ठेसह हिंदू संघटनांचा मुगल विरोध पुन्हा एकदा समोर आलाय.
500 वर्षानंतर रामलला रामंदिरात होणार विराजमान
22 जानेवारीला अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराच उद्घाटन आहे. याच दिवशी अयोध्येत रामललाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची नवीन मुर्ती स्थापित करण्यात आली आहे. मंदिर परिसर आणि गर्भगृहात पूजाऱ्यांनी पूजापाठ आणि अनुष्ठान सुरु केले आहेत. जवळपास 500 वर्षानंतर रामलला आपल्या भव्य रामंदिरात विराजमान होणार आहे.
अयोध्येला छावणीच स्वरुप
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी खास तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: उद्घाटन कार्याचा आढावा घेत आहेत. शुक्रवारी सीएम योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत पोहोचून अधिकाऱ्यांची बैठक घेतली. निर्माण कार्याचा आढावा घेतला. राम मंदिर प्राण प्रतिष्ठेसाठी मोठ्या संख्येने व्हीआयपी येणार आहेत. अयोध्येला छावणीच स्वरुप आलं आहे.