Ram Shinde | कर्जतचं राजकारण तापलं! उमेदवारांना धमकावलं जात असल्याचा राम शिंदेचा आरोप

राज्यात जवळपास 105 नगर पंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.अनेक ठिकाणी डाव-प्रतिडावात टाकत रंजक राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

Ram Shinde | कर्जतचं राजकारण तापलं! उमेदवारांना धमकावलं जात असल्याचा राम शिंदेचा आरोप
रोहित पवार, राम शिंदे
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 8:21 PM

कर्जत : गेल्या काही दिवसांपासून कर्जतचं (Karjat) राजकारण तापलंय. नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. अशातच राम शिंदे (Ram Shinde) यांनी सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना धमकावलं जात असल्याचा आरोप केलाय. कर्जत नगरपंचायतीत धमकावून अनेकांना अर्ज मागे घ्यायला लावले आहेत, असं राम शिंदे यांनी म्हटलंय.

कर्जत, पानरे, शिर्डी आणि नगर अकोले नगर पंचायतींसाठी राजकीय चुरस पाहायला मिळतेय. कर्जतमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा संघर्ष रंगलाय. भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे राम शिंदे यांनी गंभीर आरोप केलेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकावलं जात असल्याचा आरोप करतानाच शिब्बा सय्यद यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आलाय. त्यांच्या प्रचारासाठी सकाळीच सभा घेण्यात आल्याचाही दावा राम शिंदे यांनी केलाय. हा सगळा सत्तेचा दहशतवाद असल्याची टीका राम शिंदे यांनी ट्विट करत केली आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाही, असंही ते म्हणालेत. लोकशाहीची सारी मूल्य पायदळी तुडवली जात असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलंय.

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

मविआ सरकारकडून लोकशाहीची सारीच मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. कर्जत नगरपंचायतीत धमकावून अनेकांना अर्ज मागे घ्यायला लावले. आज प्रभाग 14च्या भाजपा उमेदवार शिबा सय्यद यांना राकाँत प्रवेश दिला. सकाळीच त्यांच्या प्रचारार्थ सभा झाली होती. हा सत्तेचा दहशतवाद जनता तुम्हाला माफ करणार नाही!

आरोप-प्रत्यारोप

राज्यात जवळपास 105 नगर पंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.अनेक ठिकाणी डाव-प्रतिडावात टाकत रंजक राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे.अनेक ठिकाणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आज हार्दिक पटेल यांनी नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. तर माजी पालकमंत्री असलेल्या राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांना वेग आलाय.

आमने-सामने

दरम्यान, बुधवारी रोहित पवार यांनी संत गोदड महाराजांचे दर्शन घेतलं होतं आणि काही वेळ मंदिरात बसून उपस्थित कार्यकर्ते यांच्याशी संवादही साधला होता. थोड्या वेळाने रोहित पवार त्याच दरवाज्याने बाहेरही आले.मात्र मंदिराबाहेर कार्यकर्त्यांना मौनव्रत आंदोलन करत बसलेल्या राम शिंदे यांच्याकडे त्यांनी ढुंकूनही बघितलं नव्हतं.

पाहा व्हिडीओ – 

संबंधित बातम्या – 

Hardik Patel in Pune | हार्दिक पटेलांची रोहित पवारांवर स्तुतिसुमनं, शरद पवारांचं नाव घेत म्हणाले…

धुळे, अहमदनगर आणि नांदेड- वाघाळा महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी, तर सांगली-मिरज-कुपवाडासाठी 18 जानेवारीला मतदान

Chain Snatching | शिकावू ग्रामसेवकच निघाला सोनसाखळी चोर! सुट्टीच्या दिवशी करायचा चोरीची कामं

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.