ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : राम शिंदे

रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणावरून माजी मंत्री राम शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले आहेय. ओबीसींना आरक्षण पुनर्स्थापन झाले पाहिजे तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा राम शिंदे यांनी घेतलाय.

ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : राम शिंदे
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 11:41 PM

अहमदनगर : रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणावरून माजी मंत्री राम शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. ओबीसींना आरक्षण पुनर्स्थापन झाले पाहिजे तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा राम शिंदे यांनी घेतलाय. ते अहमदनगर येथे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. या सरकारमधले मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. तसेच ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सरकारचा निष्काळजीपणा आणि नाकार्तेपणा समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय (Ram Shinde warn MVA government over OBC reservation and upcoming election).

“सरकारमधील ओबीसी नेतेच स्वतः मोर्चा आंदोलनाची भाषा करत आहेत”

राम शिंदे म्हणाले, “महाविकासआघाडी सरकारमधील ओबीसी नेतेच स्वतः मोर्चा आंदोलनाची भाषा करत आहेत. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार स्वतः त्यांचं कुणी ऐकत नाही असं सांगत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण झालाय. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी येणाऱ्या 26 जून रोजी 1 हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार आहोत.”

“‘कोणी कोणाचा ऐकायचं नाही ‘ हा एकच सरकारमधील किमान समान कार्यक्रम”

“सरकारमधल्या मंत्र्यांनी निर्णय करायचा असतो, मात्र दुर्दैवाने तेच आंदोलन करत आहेत. ‘कोणी कोणाचा ऐकायचं नाही ‘ हा एकच किमान समान कार्यक्रम या सरकारमध्ये आहे. एका मंत्र्याने घेतलेला निर्णय दुसऱ्याने जाहीर करायचा आणि तिसऱ्याने सांगायचा असं सुरू आहे. कोणी कोणाचं ऐकत नाही, तर मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही. त्यामुळे मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला,” अशी टीका राम शिंदे यांनी केली.

“मलिदा खाणं आणि एकमेकांची जिरवणे यातच सरकारचा वेळ चाललाय”

राम शिंदे म्हणाले, “सरकारला आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळे वेळकाढूपणा चालू असून चांगलं काम करायला वेळ नाही. त्यांचा मलिदा खाणं आणि एकमेकांची जिरवणे यातच वेळ चाललाय. सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही. जर ओबीसींचे गेलेले आरक्षण पुन्हा मिळाले नाही, तर तीव्र आंदोलन करू,” असा इशारा शिंदे यांनी राज्य सरकारला दिलाय.

हेही वाचा :

राम शिंदेंना धक्का, जामखेडमध्ये नगराध्यक्षांसह 10 नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत

राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने आले आणि…

मोठी बातमी: अजित पवार आणि राम शिंदेंची गुप्त बैठक?

व्हिडीओ पाहा :

Ram Shinde warn MVA government over OBC reservation and upcoming election

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.