मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढता कामा नये. ही अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती विधेयक मंजूर व्हावं. यासाठी संसदेत सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे या मुद्द्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा होऊन सहमती झालीय. याबाबत स्वतः रामदास आठवले यांनी माहिती दिलीय. त्यांनी आज (9 जून) सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन पवारांशी मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या विषयावर चर्चा केली. त्यावेळी शरद पावर यांनी मराठा अरक्षणासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं (Ramdas Athawale meet Sharad Pawar over reservation in promotion issue).
रामदास आठवले म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी रिपब्लिकन पक्षाने नेहमी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 50 टक्के आरक्षण मर्यादेची अट रद्द करण्यास सर्व पक्षीयांनी प्रयत्न करावेत. मीही केंद्रात प्रयत्न करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असं मत मी शरद पवार यांच्याशी चर्चा करताना मांडलं.”
“शरद पवार यांनी सांगितलं की राज्य सरकार कायदेशीर बाबी तपासून मंत्रीमंडळाशी चर्चा करून याबाबत लवकर अनुकूल निर्णय घेण्याचा आपला प्रयत्न राहील,” असंही रामदास आठवलेंनी नमूद केलं. शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीवेळी रामदास आठवले यांच्यासोबत रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर उपस्थित होते.
शिवसेना आणि भाजपची 30 वर्षांपासूनची मैत्री होती. उद्धव ठाकरे यांनी या मैत्रीचा विचार करावा. भाजपसोबत यावं आणि मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची काल भेट झाली. या भेटीमधून राज्याला बऱ्याच अपेक्षा आहेत, असं ते म्हणाले.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Ramdas Athawale meet Sharad Pawar over reservation in promotion issue