AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Athawale : ‘संभाजीराजे शिवसेनेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही’, रामदास आठवलेंचं वक्तव्य; भाजपनं 6 वर्षे राज्यसभा दिल्याचीही करुन दिली आठवण

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलंय. संभाजीराजेंना शिवसेना राज्यसभा देत असेल तर ते शिवसेनेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय.

Ramdas Athawale : 'संभाजीराजे शिवसेनेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही', रामदास आठवलेंचं वक्तव्य; भाजपनं 6 वर्षे राज्यसभा दिल्याचीही करुन दिली आठवण
संभाजीराजे छत्रपती, रामदास आठवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 9:54 PM

ठाणे : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. तर सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलंय. सर्व राजकीय पक्षांकडे त्यांनी सहकार्याचं आवाहनही केलं आहे. त्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिसाद दिलाय. तर संभाजीराजे यांना शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची आणि राज्यसभा उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं वक्तव्य केलंय. संभाजीराजेंना शिवसेना राज्यसभा देत असेल तर ते शिवसेनेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय.

रामदास आठवले म्हणाले की, संभाजीराजेंना शिवसेना राज्यसभा देत असेल, तर ते शिवसेनेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. सोबतच भाजपनं त्यांना 6 वर्ष राज्यसभा दिली होती, अशी आठवणही त्यांनी करून दिलीय. रामदास आठवले आज डोंबिवलीत संदप गावात खदानी बुडून मृत्यू झालेल्या पाच जणांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आले होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे शिवसेनेत जाण्याची शक्यता असल्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. यावर संभाजीराजेंनी शिवसेनेमध्ये जाऊ नये. त्यांना सहा वर्ष भाजपनं राज्यसभा दिली होती, त्यामुळे त्यांनी भाजपमध्येच राहिलं पाहिजे, असा सल्लाही रामदास आठवलेंनी दिला. तसंच त्यांना कोणत्या पक्षात जायचं असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांना शिवसेना राज्यसभा देत असेल तर ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही आठवले यावेळी म्हणाले.

संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा उमेदवारीसाठी शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. शनिवारी संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती. त्यावेळी संभाजीराजे यांनी ही ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेना दुसरा उमेदवार देणार

संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना करत आपण राज्यसभेसाठी अपक्ष उभे राहणार असल्याचं जाहीर केलं. तसंच सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन पाठवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मात्र, संभाजीराजे यांची राज्यसभेसाठीची वाट खडतर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिवसेना सहाव्या जागेवर उमेदवार देणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे संभाजीराजेंचं दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यसभेच्या संख्याबळाचं गणित कसं?

राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 42 मतांची गरज आहे. भाजपकडे सध्या 113 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यात भाजपचे 106, रासप 1, जनसुराज्य 1 आणि 5 अपक्षांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदार आहेत. या संख्याबळानुसार भाजपचे दोन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल. तर सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढणार आहेत.

बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला.
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्...
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्....
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये.
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी.
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच...
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच....
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं.
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल.
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ...
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ....