Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Athawale : ना गणेशोत्सवा नंतर, ना दिवाळीनंतर, महापालिका निवडणुका कधी होणार?; आठवलेंनी सांगितला नेमका महिना

Ramdas Athawale : ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळायला हवं ही मागे मागणी केली होती. याचा विचार आता पुन्हा नक्की करण्यात येईल. मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं. तसंच ब्राह्मण समाजालाही आरक्षण दिलं पाहिजे ही मागणीमी सर्वात आधी केली होती.

Ramdas Athawale : ना गणेशोत्सवा नंतर, ना दिवाळीनंतर, महापालिका निवडणुका कधी होणार?; आठवलेंनी सांगितला नेमका महिना
ना गणेशोत्सवा नंतर, ना दिवाळीनंतर, महापालिका निवडणुका कधी होणार?; आठवलेंनी सांगितला नेमका महिनाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 3:57 PM

अभिजीत पोटे, पुणे: मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी (corporation election) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, या निवडणुका कधी होणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्व लागलेलं असतानाच रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यातील महापलिका निवडणूक लवकर व्हाव्यात हीच आमची ईच्छा आहे. पण आधीच्या ठाकरे सरकारनं प्रभाग बदलले आणि सगळा गोंधळ झाला. त्यामूळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आधीच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाने अनेक अडचणी आल्या. पण आता शिंदे सरकार (maharashtra government) सगळ्या गोष्टी नीट करत आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होतील, अशी शक्यता रामदास आठवले यांनी वर्तवली आहे.

आज बालगंधर्व रंगमंदिरात रिपाइंचा मेळावा झाला. यावेळी रामदास आठवले यांनी ही शक्यता वर्तवली आहे. आधी शिवसेना ही भाजप आणि आरपीआयसोबत होती. पण मधल्या काळात आमच्यापासून दूर गेली. पण आता खरी शिवसेना आमच्या सोबतच आहे. आम्ही एकनाथ शिंदे गट आणि भाजपसोबत युती करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहोत. आम्हाला अधिक जागा मिळाव्या आणि सत्तेत देखील वाटा मिळावा यासाठी मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

आम्ही आहोत पक्के

विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून रोज नव्या घोषणा दिल्या जात आहेत. त्यावरही भाष्य करताना रामदास आठवले यांनी कवितेच्या चार ओळी ऐकवल्या. ते म्हणतायत 50 खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के, अशा कवितेच्या चारओळीच आठवले यांनी ऐकवल्या.

हे सुद्धा वाचा

सरकार पडणार नाही

विरोधक आमचं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र तुम्ही काही केलं तरी आमचं सरकार पडणार नाही. येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत आम्ही निवडून येऊ आणि सरकार स्थापन करू. हे विरोधक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

दलितांवरील अत्याचार रोखणार

पक्ष बांधणीसाठी हे संमेलन होत. आणखीन पदे लवकरच निवडण्यात येणार आहेत. आज दलित पँथरचा स्थापना दिवस पुण्यात होणार आहे. संपूर्ण राज्यभर अम्ही अंनेक कार्यक्रम राबवत आहोत. दलितांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

ब्राह्मणाला आरक्षण द्या

ब्राह्मण संघाच्या आनंद दवे यांची भेट झाली. अमृत योजनेबद्दल चर्चा झाली. ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळायला हवं ही मागे मागणी केली होती. याचा विचार आता पुन्हा नक्की करण्यात येईल. मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं. तसंच ब्राह्मण समाजालाही आरक्षण दिलं पाहिजे ही मागणीमी सर्वात आधी केली होती, असंही ते म्हणाले.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.