फडणवीसांनी माझं ‘ते’ मत ऐकलं असतं तर आज मुख्यमंत्री असते, आठवले बोलता बोलता बरंच बोलून गेले!
कार्यक्रमात नेहमीप्रमाणे आठवलेंनी जोरदार टोलेबाजी केली. आपल्या चारोळ्यातून त्यांनी टोपेंचं कौतुक केलं तर फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर मिश्किलपणे देखील बोट ठेवलं. (Ramdas Athawale Statement on Devendra fadanvis Cm Post In Sanmaan Devdoot Event)
मुंबई : ‘सन्मान देवदूतांचा’ (Sanmaan Devdoot) हा विशेष कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात कोरोनायोद्ध्यांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) तसंच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे आठवलेंनी जोरदार टोलेबाजी केली. आपल्या चारोळ्यातून त्यांनी टोपेंचं कौतुक केलं तर फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर मिश्किलपणे देखील बोट ठेवलं. ‘त्यावेळी माझं जर फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते’, असं आठवले म्हणाले. (Ramdas Athawale Statement on Devendra fadanvis Cm Post In Sanmaan Devdoot Event)
तर आज फडणवीस मुख्यमंत्री असते…!
मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपची ताटातूट झाली आणि पुढे जाऊन सेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आपला नवा संसार थाटला. सत्तासंघर्षाच्या याच काळात मी फडणवीसांना सल्ला दिला होता की शिवसेनेला अडीज वर्षाचं मुख्यमंत्रिपद देऊन टाका… माझं जर ते म्हणणं फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असं आठवले म्हणाले. आठवले एवढंच बोलून थांबले नाहीतर तर तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असंही त्यावेळी मी सांगितलं होतं, अशी आठवणही आठवलेंनी सांगितली.
आठवलेंच्या विधानांनी आणि सत्तासंघर्षकाळातल्या आठवणींनी सभागृहातील उपस्थित पोट धरुन हसले. तर फडणवीस आज मुख्यमंत्री असते, असं आठवले म्हणताच देवेंद्र यांच्या चेहऱ्यावर देखील स्मितहास्य उमटलं.
महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज मुंबई येथे आयोजित ‘सन्मान देवदूतांचा’ या कार्यक्रमात आज कोरोना काळात रूग्णसेवा करणारे डॉक्टर्स-आरोग्य कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचा सन्मान केला. pic.twitter.com/EZ0mE1drs9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2021
पण राजेश टोपे पुरुन उरले…
कोरोना काळात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी उत्तम काम केलं. घरच्या कुटुंबाप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घेतली. विरोधक असलेल्या भाजपनेही कोरोनाकाळात टोपेंवर कधी टीका केली नाही. आजच्या कार्यक्रमात आठवलेंनी देखील टोपेंच्या कोरोना काळातल्या कामाचं कौतुक केलं.
‘कोरोनच्या काळात आरोग्य खातं चालवणे नव्हते सोपे, पण त्याला पुरुन उरले राजेश टोपे…’, अशा शब्दात खास आठवले स्टाईलमध्ये त्यांनी आरोग्यमंत्र्यांचं कौतुक केलं. आरोग्यमंत्री म्हणून टोपेंनी खूप उत्तम काम केलं, म्हणत त्यांनी टोपेंच्या पाठीवर शाबासकी दिली.
आठवलेंच्या कवितेने उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे
कोरोना पेशंट होतो मी सुद्धा, पण आपण आहात कोरोना योद्धा… वंदन करतो शिवाजी महाराज, आंबेडकर आणि गौतम बुद्धा…. कारण माझ्या मनात आहे तुमच्याबद्दल श्रद्धा… जसं घरघर चालत असतं जातं, तसंच असतं माणुसकीचं नातं… जसं बँकेत असतं आपलं खातं… तसं नसतं माणुसकीचं नातं… कोरोनाने साऱ्या जगाला नाचवले पण डॉक्टरांनी लाखो रुग्णांना वाचवले… अनेक पेशंटला मी हॉस्पिटल मध्ये पाठवले तेव्हा बॉम्बे हॉस्पिटलचे दिवस मला आठवले… आणि मी आहे रामदास आठवले… मी दिला होता गो कोरोना गो चा नारा, कोरोनाला गो म्हणता म्हणता कोरोना माझ्या पाठी लागला…!
(Ramdas Athawale Statement on Devendra fadanvis Cm Post In Sanmaan Devdoot Event)
हे ही वाचा :
‘स्वप्निल लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेली हत्या’, आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
आता तारीख नाही, अॅटॅक होईल, मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका: नरेंद्र पाटील