“काँग्रेस रसातळाला गेलाय, गुलाम नबी आझादांप्रमाणे तुम्हीही पक्ष सोडा” आठवलेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी अशोक चव्हाण यांना मोलाचा सल्ला दिलाय.

काँग्रेस रसातळाला गेलाय, गुलाम नबी आझादांप्रमाणे तुम्हीही पक्ष सोडा आठवलेंचा अशोक चव्हाणांना सल्ला
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 4:20 PM

मुंबई : सणवाराच्या दिवसात महाराष्ट्रात मात्र राजकारणीय चर्चांना उधाण आलंय. कोण-कुणाला भेटतं, काय चर्चा होतेय. काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकमेकांना भेटल्याची माहिती उघड झाली आहे. या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. अश्यात रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी अशोक चव्हाण यांना मोलाचा सल्ला दिलाय. “काँग्रेस रसातळाला गेलाय. आता काँग्रेसमध्ये काहीही उरलेलं नाही. काही दिवसांआधी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम केला. तसं तुम्हीही पक्ष सोडा”, असा सल्ला रामदास आठवलेंनी अशोक चव्हाणांना दिलाय. गणपतीनिमित्त रामदास आठवले यांची टीव्ही 9 मराठीवर मुलाखत झाली. तेव्हा त्यांनी हे भाष्य केलंय.

ती गुप्त भेट

काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल भेट झाली. ही गुप्त भेट आता उघड झाली आहे. अशोक चव्हाण भाजपचे प्रवक्ते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. तिथेच देवेंद्र फडणवीसही गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. दोन्ही नेते एकमेकांच्या समोरासमोर आले. त्यांच्यात भेट झाली. तिथे त्यांच्यात काहीवेळ भेट झाली. त्यांच्यात झालेली भेट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे.

हे सुद्धा वाचा

आठवले मनसे भाजप युतीवर काय म्हणाले?

रिपाई नेते रामदास आठवले यांनी राज ठाकरेंच्या व्यक्तीमत्वाचं कौतुक केलं. शिवाय त्यांनी मनसे भाजप युतीवरही भाष्य केलं. “राज ठाकरे चांगले नेते आहेत. सभा होतात. पण त्यांना मतं मिळत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंना भाजपने सोबत घ्यावं हे माझं मत नाही. भाजपला तशी आवश्यकताच नाही.राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतलं तर त्यांना उत्तर भारतीय, साउथ इंडियन मतं मिळणार नाहीत. मनसेला सोबत घेतलं तर देशपातळीवर नुकसान होऊ शकतं. राज ठाकरेंची भूमिका मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे. पण मुंबईतल्या इतर लोकांना विरोध करण्याच्या भूमिकेमुळे भाजपाला हे परवडणारं नाही”, असं आठवले म्हणालेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.