Ramdas Kadam :आदित्य ठाकरेंना या वयात ‘साहेब’ म्हणावं लागतंय, रामदास कदम यांची खदखद

'जे आदित्य ठाकरे आधी काका काका करायचे त्यांनीच माझं मंत्रालय घेतलं, असंही कदम म्हणालेत. आदित्य ठाकरे मंत्रालयात येऊन बैठका लावायचे. ठाकरे असल्यानं सहन केलं, असंही कदम म्हणालेत.

Ramdas Kadam :आदित्य ठाकरेंना या वयात 'साहेब' म्हणावं लागतंय, रामदास कदम यांची खदखद
रामदास कदम, आदित्य ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 12:05 PM

मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ‘टीव्ही9 मराठी’वर संवाद साधताना शिवसेनेच्या चुकांवर बोट ठेवलं. यावेळी रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं. यावेळी कदम म्हणाले की,  माझं वय 70 आहे. तरी मला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतं. कारण ते ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे हे ‘मातोश्री’मधले आहेत. पण, अन्य कोणत्याही मंत्र्यांनी कसंही बोलं तरी चालतं. पण, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना असं बोलायला नको होतं, असंही रामदास कदम यावेळी म्हणालेत. यावेळी ‘टीव्ही9 मराठी’वर संवाद साधताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अनेक सवाल केले आहेत. यावेळी वारंवार त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते. मागच्या 52 वर्षांत शिवसेनेसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी यावेळी माहिती दिले. तरीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं रामदास कदम यावेळी म्हणालेत. दरम्यान, यावेळी रामदार कदम यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरही टीकास्त्र सोडलंय. रामदास कदम यांना यावेळी आश्रू अनावर झाले.

आदित्य ठाकरेंनी माझंच मंत्रालय घेतलं…

‘जे आदित्य ठाकरे आधी काका काका करायचे त्यांनीच माझं मंत्रालय घेतलं, असंही कदम यावेळी म्हणालेत. आदित्य ठाकरे मंत्रालयात येऊन बैठका लावायला लावायचे. आम्हीही ठाकरे असल्यानं सहन केलं, असंही कदम म्हणालेत.

आदित्य ठाकरेंच्या भाषेवर आक्षेप

शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्या भाषेवरही आक्षेप घेतला. अन्य कोणत्याही मंत्र्यांनी कसंही बोलं तरी चालतं. पण, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना असं बोलायला नको होतं, असंही रामदास कदम यावेळी म्हणालेत. बंडखोरांवर टीका करताना शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वारंवार अपमानास्पदरित्या बंडखोरांवर टीका केली होती. यावरुनच कदम यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय.

चौकडीला बाजूला करा

यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आजुबाजूच्या चौकडीला बाजू करावं, असंही म्हटलंय. यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता टीका केलीय.

आदित्य ठाकरे यांनाही सुनावलं

शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मागच्या अनेक दिवसांपासून कदम नाराज होते. आज ‘टीव्ही9 मराठी’वर संवाद साधताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही सवाल केलेत. यावेळी त्यांनी शिवसेना कशी तळाला जात आहे, याचंही उदाहरण दिलं. याचवेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनाही सुनावलं. शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी गंभीर टीका केली होती.

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.