योगेश कदम यांचा अपघात, रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

रामदास कदम यांनी योगेश कदम यांच्या अपघातासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यांवर गंभीर आरोप केलाय. योगेशला जीवानीशी संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

योगेश कदम यांचा अपघात, रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 5:17 PM

रत्नागिरी : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) अपघाताची सत्र सुरु आहे. खेडचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा शुक्रवारी रात्री अपघात झाला होता. त्यासंदर्भात योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर टीव्ही-९ शी बोलताना योगेश कदम यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. आता माजी मंत्री रामदास कदम यांनी गंभीर आरोप केलाय.

माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झालाय. सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप आहेत. मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.

हे सुद्धा वाचा

योगेश कदम यांना Y+ सुरक्षा आहे. त्यांच्या गाडीसोबत पोलिसांची गाडी होती. अपघात झालेल्या ठिकाणी यापुर्वी अनेकदा अपघात झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत आहे. त्यानंतर दखल घेतली जात नाही. योगेश कदम अपघातातून वाचले नसते तर काही उपययोजना सुरु झाली असती, असा आरोपच आमदार योगेश कदम यांनी केला. हिवाळी अधिवेशात मुंबई-गोवा महामार्गाचा विषय मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्माक असल्याचे सांगितले.

घातपाताची व्यक्त केली शक्यता दरम्यान या अपघातसंदर्भात योगेश कदम यांनी हा अपघात घातपात असल्याची शक्यता नाकारली नाही. अपघाताचा पॅटन साधारण अपघातासारखा नाही. माझ्या गाडीच्या मागेपुढे पोलिसांची गाडी असताना डप्परने धडक दिली. त्यामुळे शंका घेण्यास मोठा वाव असल्याचे कदम यांनी सांगितले. दरम्यान या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांकडे अपघाताच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी टीव्ही९ शी बोलतांना सांगितले.

काय म्हणाले रामदास कदम – रामदास कदम यांनी योगेश कदम यांच्या अपघातासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यांवर गंभीर आरोप केलाय. योगेशला जीवानीशी संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. यापुर्वी योगेशला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. आता जीवानीशी संपवण्याचा प्रयत्न त्यांचा असल्याचा मला संशय आहे, असे रामदास कदम यांनी सांगितलंय. यासंदर्भात आपण पोलिसांशी चर्चा केली आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांकडे तक्रार करणार आहे.

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.