खोतकरांच्या नाराजीचा भाजपला धसका, दानवेंसह सहकारमंत्री भेटीला

जालना : जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आणि मंत्री अर्जुन खोतकर यांची समजूत काढण्यासाठी आता भाजपचे नेते सरसावले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख हे अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अर्जुन खोतकरांकडे भाजपचं शिष्टमंडळ पाठवलं आहे. या शिष्टमंडळाकडून अर्जुन खोतकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. […]

खोतकरांच्या नाराजीचा भाजपला धसका, दानवेंसह सहकारमंत्री भेटीला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:21 PM

जालना : जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आणि मंत्री अर्जुन खोतकर यांची समजूत काढण्यासाठी आता भाजपचे नेते सरसावले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख हे अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अर्जुन खोतकरांकडे भाजपचं शिष्टमंडळ पाठवलं आहे. या शिष्टमंडळाकडून अर्जुन खोतकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

अर्जुन खोतकरांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निर्णय घेतील. माझ्यासाठी उद्धव ठाकरे यांचाच शब्द अंतिम आहे, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले.

जालना जिल्ह्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर विरुद्ध भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हा वाद जुना आहे. त्यात खोतकरांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, आधी स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेने ऐनवेळी कच खाल्ली आणि भाजपसोबत सलगी करत युती केली. त्यामुळे खोतकरांच्या इच्छेवर पाणी फेरण्याची लक्षणं दिसून लागली. मात्र, दानवेंविरोधात आपण लढणारच, अशी ताठर भूमिका खोतकरांनी घेतली.

एकीकडे खोतकर-सत्तार गुफ्तगू, दुसरीकडे दानवे-टोपे गळाभेट

गेल्या काही दिवसात अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची दोनदा भेट घेतली, त्यानंतर कालच खोतकरांनी काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे खोतकर काँग्रेसचा ‘हात’ पकडणार का, अशीही जालन्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. हेच लक्षात घेऊन आता भाजपने हातपाय हलवायला सुरुवात केली आहे.

जालन्यात दानवे-खोतकरांची गळाभेट, सर्वांच्या भुवया उंचावल्या

भाजपने खोतकरांची नाराजी दूर केली नाही, तर जालना लोकसभा मतदारसंघातून रावासाहेब दानवे यांना खोतकरांच्या रुपाने तगडं आव्हान उभं राहण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता ओळखूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपचं शिष्टमंडळ खोतकरांच्या भेटीला पाठवलं आहे. यात स्वत: रावसाहेब दानवेही असल्याने या भेटीत नेमके काय होणार, याकडे जालन्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.