AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raosaheb Danve : मी ईडी मागे लावली का हे अर्जुन खोतकरांना विचारा ते उत्तर देतील – रावसाहेब दानवे

मी माझ्या वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला आलो होतो. मागच्या वेळेस आणि या वेळेस योगायोगाने मुख्यमंत्र्यांशी भेट झाली आहे. मी शिंदे गटात सहभागी झालेलो नाही , त्यांच्याकडून कुठलाही दबाव नाही.

Raosaheb Danve : मी ईडी मागे लावली का हे अर्जुन खोतकरांना विचारा ते उत्तर देतील - रावसाहेब दानवे
Raosaheb Danve : मी ईडी मागे लावली का हे अर्जुन खोतकरांना विचारा ते उत्तर देतील - रावसाहेब दानवेImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 2:27 PM

मुंबई – अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज एकत्र आणले आहे. एकनाथ शिंदे यांनी दोघांना दिल्लीत एकत्र बसवलं आणि राजकीय चर्चेला उधाण आलं. राजकीय चर्चा सुरु झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री माझी दिल्लीत आल्यानंतर आणि महाराष्ट्रात असताना देखील सतत भेट घेत असतात. अर्जुन खोतकर आणि मला एकत्र बसवलं होतं. त्यांना मागचं विसरून जा असं सांगितलं. पुन्हा एकत्र काम करा असंही सांगितले. मीही मान्य केलं आणि खोतकरनीही मान्य केलं असल्याची कबूली रावसाहेब दानवेंनी दिली. कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची हे त्यांना विचारा, मीही खूश आहे. मी ईडी मागे लावली हे त्यांना विचारा ते तुम्हाला उत्तर देतील. मराठवाडा भाजपा आणि शिवसेना युतीच्या पाठीमागे राहत आलाय पुढेही राहिलं.आमचे तर सगळे सोबत आहोत अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली.

मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यापासून शिंदे गटात रोज नव्याने भर्ती सुरु झाली आहे. त्याचबरोबर अर्जुन खोतकर हे सुद्धा जाणार असल्याची मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आज ते दिल्लीत भाजपाच्या काही नेत्यांना भेटल्यानंतर शिंदे गटात गेल्याची चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच भाजप आणि शिंदे गटाचे काही आमदार आणि खासदार दिल्लीत आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार राहुल शेवाळे, खासदार रोहिदास लोखंडे, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, खासदार धैर्यशील माने, खासदार कृपाल तुमाने आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

मी शिवसैनिक कायम राहणार

मी माझ्या वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला आलो होतो. मागच्या वेळेस आणि या वेळेस योगायोगाने मुख्यमंत्र्यांशी भेट झाली आहे. मी शिंदे गटात सहभागी झालेलो नाही , त्यांच्याकडून कुठलाही दबाव नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा सैनिक आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटी वेळी सगळेच खासदार होते त्यात रावसाहेब दानवेही होते. मी शिवसैनिक कायम राहणार असल्याचं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.

ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?.
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?.