रावसाहेब दानवेंकडून भाजपचा दुसरा उमेदवार घोषित!

कोल्हापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आले खरे, मात्र प्रश्नांचा भडिमार होताच दानवेंवर पत्रकार परिषद आटोपण्याची वेळ आली. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवाराबाबतच इतर प्रश्न पत्रकारांनी विचारले. मात्र त्याला दानवे यांनी बगल दिली. एव्हढेच काय तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरंही देण्याची त्यांनी टाळलं. त्याचबरोबत उद्धव ठाकरेंनी काल केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने यू […]

रावसाहेब दानवेंकडून भाजपचा दुसरा उमेदवार घोषित!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

कोल्हापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आले खरे, मात्र प्रश्नांचा भडिमार होताच दानवेंवर पत्रकार परिषद आटोपण्याची वेळ आली. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवाराबाबतच इतर प्रश्न पत्रकारांनी विचारले. मात्र त्याला दानवे यांनी बगल दिली. एव्हढेच काय तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरंही देण्याची त्यांनी टाळलं.

त्याचबरोबत उद्धव ठाकरेंनी काल केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने यू टर्न घेतल्याचे दानवेंच्या बोलण्याबावरून स्पष्ट होत होतं. पटकणे म्हणजे जे विरोधात येतील त्यांचा पराभव करणे, असे अमित शाह यांना म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण दानवेंनी दिलं. त्याचबरोबर लोकसभेची तयारी झाली असून 48 जागाही लढण्याची आमची तयारी असल्याचे दानवेंनी म्हटले. यावेळी बोलताना दानवे यांनी काँग्रेसचा समाचार घेत कितीही आघाड्या झाल्या तरी सरकार भाजपचेच येणार असल्याचा दावा केला आहे.

यावेळी दानवेंनी कोल्हापूर, हातकणंगले, सांगली लोकसभा मतदार संघाचा आढावा सुरू असल्याचं सांगितलं. 48 मतदारसंघात विस्तारक नेमले आहेत, असं ते म्हणाले.

काँग्रेसने आतापर्यंत कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याला मोठं केलं नाही. कितीही आघाड्या झाल्या तरी भाजपचेच सरकार येणार. लोकसभेत कोणत्याही परिस्थितीत आमचं सरकार येणार. युतीसाठी आम्ही प्रयत्न करतोय, युती झालीच नाही तर जे आमच्याविरोधात येतील त्यांचा पराभव करणार,  असं दानवे म्हणाले.

रावसाहेब दानवेंकडून दुसरा उमेदवार घोषित

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष असलेल्या रावसाहेब दानवे यांनी लोकसभेसाठी भाजपचा दुसरा उमेदवार घोषित केला. यापूर्वी दानवे यांनी बीडमधून विद्यमान भाजप खासदार प्रितम मुंडे यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यानंतर आज रावसाहेब दानवे यांनी  स्वतःची लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. जालन्यातून स्वत: लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं दानवे म्हणाले. यावेळी त्यांना शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं आव्हान आहे. त्याबाबत विचारलं असता दानवे म्हणाले, ‘आतापर्यंत असे अनेक आलेत आणि मी त्यांना नीट केलं आहे.’

जालन्यात खोतकर आणि दानवे यांच्यात टोकाचा वाद आहे. ‘कुणीही पुढे आले तरी मी निवडणूक लढणारच आहे’, असं म्हणत दानवे यांनी स्वतःच स्वतःची लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपने आतापर्यंत 2 उमेदवारांची घोषणा केली असं म्हणायला हरकत नाही.

जालना लोकसभा : 20 वर्षांपासून खासदार, पण दानवेंविरोधात नाराजी कायम

संबंधित बातम्या

लोकसभेसाठी काँग्रेसच्या 9 उमेदवारांची नावं ठरली  

कोल्हापुरातून हसन मुश्रीफांना तिकीट नाहीच!  

जालना लोकसभा : 20 वर्षांपासून खासदार, पण दानवेंविरोधात नाराजी कायम

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.