मुख्यमंत्र्यांसमोर दानवे म्हणाले, अब्दुल सत्तारांना मतदान करु नका, बघू लोक कुणाचं ऐकतात!

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आच एकाच मंचावर होते, निमित्त होतं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या जि.प. वास्तूच्या भूमिपूजनाचं... यावेळी दानवेंनी नेहमीच्या स्टाईलमध्ये आपल्या भाषणात मंचावरच्या पुढाऱ्यांना लगावले.

मुख्यमंत्र्यांसमोर दानवे म्हणाले, अब्दुल सत्तारांना मतदान करु नका, बघू लोक कुणाचं ऐकतात!
रावसाहेब दानवे
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 11:29 AM

औरंगाबाद :  मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आच एकाच मंचावर होते, निमित्त होतं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या जि.प. वास्तूच्या भूमिपूजनाचं… यावेळी दानवेंनी नेहमीच्या स्टाईलमध्ये आपल्या भाषणात मंचावरच्या पुढाऱ्यांना लगावले. तसंच सेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची दानवेंनी मुख्यमंत्र्यांसमोर फिरकी घेतली. अब्दुल सत्तारांना मतदान करु नका, असं दानवेंनी उपस्थितांना मुख्यमंत्र्यांसमोर सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री आणि सत्तारही हसले.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. यावेळी नेहमीप्रमाणे दानवेंनी आपल्या भाषणात किस्से आणि जुन्या प्रसंगाची पेरणी केली.

रावसाहेब दानवे काय म्हणाले…?

सोलापूरपासून धुळ्यापर्यंत रेल्वे झाली नाहीतर रावसाहेब दानवे यांना मतदान करून नका असं अब्दुल सत्तार यांनी पाठीमागे जनतेला सांगितलं. मग मी पण आता म्हणतो, सिलोड जिल्हा झाला नाही तर अब्दुल सत्तार यांना मतदान करू नका, बघू मग लोक कुणाचं ऐकतात, अशी फटकेबाजी दानवेंनी केली. यावेळी दानवे, सत्तार आणि मुख्यमंत्रीही हलकेसे हसले.

मुख्यमंत्री महोदय तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा, पुढचं माझं मी बघतो

रावसाहेब दानवे यांनी नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांना पाठिशी राहण्याची विनंती केली. तसंच तुम्ही माझ्यासोबत असाल तर मी पुढचं पुढं मी बघतो, असंही दानवे म्हणाले.

तुमच्या पाठिशी राहण्याचा शब्द देतो- मुख्यमंत्री

माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता”

दानवेंच्या 65 रुपयांच्या चेकचा किस्सा

दानवे म्हणाले, ग्रामीण विकासाची पाया म्हणजे जिल्हा परिषद आहे. मी या जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. त्यावेळी भाजप नव्हता, जनता पक्ष होता, आणि नांगराच्या चिन्हावर मी निवडून आलो होतो. मला तेव्हा 65 रुपयांचा भत्त्याचा चेक मिळाला… मला चेक देताना मॅनेजर चेक देईना… ते मला ओळखेना, कारण मी सभापती असेन असं त्यांना वाटत नव्हतं, असा धमाल किस्सा दानवेंनी आपल्या भाषणात सांगितला.

त्यावेळी मंचावरचा एकही राजकारणात नव्हता

शालेय जीवनातच मी माझ्या राजकारणाची सुरुवात केली, असं सांगताना आता मंचावर बसलेले कुणीही त्याकाळी राजकारणात नव्हते, असं सांगायला दानवे विसरले नाहीत. तसंच यावेळी त्यांनी राज्याच्या आणि मराठवाड्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांना मदतीचं आवाहन केलं.

(Raosaheb Danve taunt Abdul Sattar presence Of Cm uddhav Thackeray Visit Aurangabad marathawada Muktisangram Din)

हे ही वाचा :

आमचे भावी सहकारी ते रेल्वे रुळ सोडून आमच्या स्टेशनवर येऊ शकता, उद्धव ठाकरेंची भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर!

मॅनेजर म्हणाला, दानवेंना बोलवा, रावसाहेब म्हणाले, ‘अहो मीच तो’, 65 रुपयांच्या चेकच्या किस्स्याने मुख्यमंत्रीही खळखळून हसले!

दानवे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, उद्धव म्हणाले, शब्द दिला!

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.