Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंची कार्यकर्त्यांसोबत ‘चाय पे चर्चा’! बशीमधून फुरके मारत लुटला चहा पिण्याचा आनंद
जालना जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात पावसाचं वातावरण आहे. आल्हाददायक वातावरण चहा कुणाला नको असतो? चहाची तलफ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आली असावी. मग काय? कार्यकर्त्यांच्या गराड्यातच दानवे छोटाशआ हॉटेलात जाऊन बसले. यावेळी त्यांनी चहा पिण्याचा आनंद लुटला.
जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालन्यात (Jalna) आपल्या कार्यकर्त्यांसोबत चहा (Tea) पिण्याचा आनंद लुटला. बशीतून फुरके मारत रावाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत चहाच्या टपरीवर चहा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चादेखील धाली. याआधीही रावसाहेब दानवे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत हॉटेलत नाश्ता करताना, रस्त्यावर बसून कार्यकर्त्यांसोबत न्हायारी करतानाही दिसून आले होते. आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना चहा पिताना रावसाहेब दावने दिसून आले आहेत.
शनिवारी रावसाहेब दानवे हे त्यांच्या मतदार संघातील जाफराबाद तालुका दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. जाफराबाद तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत त्यांनी यावेळी बाचतीत केली. या चर्चेवेळी ते एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी एके ठिकाणी चहा घेतला. बशीतून फुरके मारत त्यांनी यावेळी चहा पिण्याचा आनंद लुटला.
पाहा लाईव्ह घडामोडी – व्हिडीओ
जालना जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात पावसाचं वातावरण आहे. आल्हाददायक वातावरण चहा कुणाला नको असतो? चहाची तलफ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आली असावी. मग काय? कार्यकर्त्यांच्या गराड्यातच दानवे छोटाशआ हॉटेलात जाऊन बसले. यावेळी त्यांनी चहा पिण्याचा आनंद लुटला.
एखादा माणूस मोठ्या पदावर गेला की त्याचं राहणीमान, वागणं, बोली बदलते. पण रावसाहेब दानवेंच्या बाबतीत या काडीमात्र बदल न झाल्याचं कार्यकर्त्यांना जाफराबाद दौऱ्यावेळी अनुभवायला मिळालं. तब्बल पाच वेळा खासदारकी, दोन वेळा आमदारकी, केंद्र सरकारमध्ये दोन वळा राज्यमंत्री मिळूनही रावसाहेब दानवे हे कार्यकर्त्यांमध्ये मिसळताना दिसतात. याआधीही ते एकदा रस्त्यावरच डबा खातानाही दिसून आले होते. रस्त्याच्या कडेला उपरणे टाकून जेवण करतानाचा रावसाहेब दानवे यांचा एक फोटो डिसेंबर महिन्यात व्हायरल झाला होता. त्यानंतर आता चहा पितानाचा व्हिडीओही समोर आलाय.