Rashmi Thackeray Brother: कुणी कुणाचा पैसा कसा वळवला? रश्मी ठाकरेंच्या भावाची EDनं सांगितलेली Modus Operandi
ED Raid on Shridhar Patankar : ईडीनं केलेल्या या कारवाईमुळे श्रीधर पाटणकरांना मोठा धक्का बसला आहे. ईडीनं केलेली ही कारवाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठीही मोठा धक्का मानली जाते आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू (Rashmi Thackeray Brother) श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या मालकीचे 11 फ्लॅट्स आज ईडीनं (ED) जप्त केले. ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे महाविकास आघाडी विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा असा संघर्ष पुन्हा ताणला जाणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई केली गेली आहे का, यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, ज्या श्रीधर पाटणकरांच्या मालकीच्या 11 फ्लॅट्सवर कारवाई करण्यात आली, ते श्रीधर पाटणकर नेमके कोणत्या प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे प्रकरण नेमकं कधीचं आहे? पैसे नेमके कुठून कसे वळवण्यात आले? नेमक्या कोणत्या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली? या सगळ्याबाबत सोप्या दहा मुद्द्यांमधून समजून घेऊयात…
10 मुद्द्यांमध्ये संपूर्ण प्रकरण
- रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक
- ईडीनं या कंपनीच्या 11 फ्लॅट जप्त केल्या
- पाटणकरांच्या कंपनीला 30 कोटी रुपयांचं विनातारण कर्ज हमसफर डिलर कंपनीनं दिलं होतं
- हमसफर डिलर ही बनावट कंपनी असल्यााच ईडीचा आरोप
- हमसफर डिलर ही नंदकिशोर चतुर्वेदी यांची कंपनी
- नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्या बनावट कंपन्यांचे पैसे पाटणकरांच्या कंपनीत टाकण्यात आले
- नंदकिशोर आणि महेश पटेल यावर मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप
- मनी लॉन्ड्रिंगच्या 30 कोटी रुपयांमधूनच ठाण्यातल्या निलांबरी प्रोजेक्टमध्ये फ्लॅट्सचं बांधकाम केल्याचा ठपका
- एकूण 11 फ्लॅट्स जप्त, 11 फ्लॅट्सची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये
- 2017 मध्ये महेश पटेल आणि चर्तुवेदीविरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल
अडचणी वाढणार?
ईडीनं केलेल्या या कारवाईमुळे श्रीधर पाटणकरांना मोठा धक्का बसला आहे. ईडीनं केलेली ही कारवाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठीही मोठा धक्का मानली जाते आहे. नेमक्या या सगळ्या प्रकरणावरुन आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. किरीट सोमय्या यांनी या प्रकऱणावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना रात्री झोप लागणार नाही, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. तर दुसरीकडे सूडबुद्धीतून ही कारवाई केली गेली असल्याचा पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय.
View this post on Instagram
पाहा व्हिडीओ :
पाहा आशिष शेलार काय म्हणाले?
सोमय्यांनी काय म्हटलं?
संबंधित बातम्या :
Rashmi Thackeray Brother : रश्मी ठाकरेंचे भाऊ असलेले श्रीधर पाटणकर नेमके आहेत कोण? जाणून घ्या!