Rashmi Uddhav Thackeray : “तुम्ही परिवाराचा भाग, परत या”, बंडखोरांना परत आणण्यासाठी रश्मी ठाकरे यांची भावनिक साद
Eknath Shinde : रश्मी ठाकरे यांनीदेखील अॅक्टिव्ह झाल्या आहेत. त्यांनी एक आवाहन केलं आहे.

मुंबई : सध्या राजकीय परिस्थिती अतिशय अस्थिर आहे. शिंदेगटात सामील होऊन गुवाहाटीला गेलेले शिवसेनेचे आमदार परत येत नाहीत. तोवर महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आहे. अश्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) सध्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी या बंडखोर आमदारांना फोन केलाय. यांच्याकडून आमदारांच्या पत्नींना फोन केला आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या पत्नींना फोन करुन रश्मी ठाकरे यांच्याकडून भावनिक साद घातली आहे. आपण राजकीय पक्ष म्हणून नाही तर आजवर परिवार म्हणून एकत्र होतो, इथून पुढेही राहू, असं रश्मी ठाकरे यांनी म्हटलंय.
सध्या मविआ सरकार वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आमदार फुटणं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हणणारे शरद पवारदेखील आता सरकार वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. शिवाय रश्मी ठाकरे यांनीदेखील अॅक्टिव्ह झाल्या आहेत. त्यांनी एक आवाहन केलं आहे.
रश्मी ठाकरे यांची भावनिक साद
सध्या मविआ सरकार धोक्यात आहे. अश्यात रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेत बंडखोरांच्या पत्नींना भावनिक आवाहन करत परत या, असं सांगितलं आहे. त्यांनी या बंडखोर आमदारांना फोन केलाय. यांच्याकडून आमदारांच्या पत्नींना फोन केला आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या पत्नींना फोन करुन रश्मी ठाकरे यांच्याकडून भावनिक साद घातली आहे. आपण राजकीय पक्ष म्हणून नाही तर आजवर परिवार म्हणून एकत्र होतो, इथून पुढेही राहू, असं रश्मी ठाकरे यांनी म्हटलंय.
शरद पवार मैदानात
महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात आलेत. उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी आणि एकनाथ शिंदे यांचं बंड आता शरद पवार हाताळणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आणि पवारांची एका तासापासून बैठक सुरु होती. शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते अनिल देसाईंमध्ये बैठक सुरु होती. तासभर झालेल्या या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यानंतर आता शिवसेनेच्या आमदारांचं बंड मोडून काढण्यासाठी शरद पवार नेमकी काय रणनिती वापरतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.