Sanjay Raut : राऊतांची घरात चौकशी अन् फ्लॅटवरही अधिकारी, चौकशीचा फास अधिक घट्ट

ईडी कार्यालयाने खा. संजय राऊत यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. मात्र, सध्या वेळ नसल्याचे राऊतांनी सांगून पुढील तारीख देण्याची मागणी केली होती. मात्र, रविवारी सकाळीच ईडीचे अधिकारी हे सुरक्षा रक्षकांबरोबर त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले होते. 10 अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असतानाच आता दादर मधील फ्लॅटवरही अधिकारी पोहचले आहे.

Sanjay Raut : राऊतांची घरात चौकशी अन् फ्लॅटवरही अधिकारी, चौकशीचा फास अधिक घट्ट
खा. संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 12:33 PM

मुंबई :  (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांची गेल्या 5 तासापासून मैत्री या त्यांच्या बंगल्यावर (ED Officer) ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्यासह आता कुटुंबियांचीही देखील चौकशी सुरु असल्याचे समोर येत आहे. असे असतानाच दुसरीकडे दादरमधील त्यांच्या फ्लॅटवरही ईडीचे अधिकारी हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणी चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. (Garden Court) गार्डन कोर्ट येथील फ्लॅटवर अधिकारी दाखल झाले असून खाली सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. त्यामुळे आता येथेही शिवसैनिकांचा गराडा पडणार का हे पहावे लागणार आहे. 7 ते 8 अधिकारी या ठिकाणी आल्याचे सांगण्यात येत आहे.

कागदपत्रांची तपासणी

ईडी कार्यालयाने खा. संजय राऊत यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. मात्र, सध्या वेळ नसल्याचे राऊतांनी सांगून पुढील तारीख देण्याची मागणी केली होती. मात्र, रविवारी सकाळीच ईडीचे अधिकारी हे सुरक्षा रक्षकांबरोबर त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले होते. 10 अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असतानाच आता दादर मधील फ्लॅटवरही अधिकारी पोहचले आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

चौकशीचा सिसेमिरा

संजय राऊत यांनी केंद्रीय संस्थाबद्दल कायम ताठर भूमिका घेतलेली आहे. शिवाय त्यांच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. पत्राचाळीतील जागेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना 1 जुलै रोजी नोटीस बजावली होती. तेव्हापासून सुरु असलेली प्रक्रिया आता थेट घरापर्यंत येऊन ठेपली आहे. एकीककडे घरात त्यांच्यासह कुटुंबियांची चौकशी सुरु असताना दुसरीकडे फ्लॅटवरही अधिकारी पोहचल्याने नेमकी काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे. या फ्लॅट खरेदीसाठी वर्षा राऊत यांच्या खात्यावर 55 लाख रुपये जमा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळेच याची चौकशी सुरु झाली आहे.

पाच तासांपासून चौकशी सुरु

गेल्या पाच तासांपासून ईडी चे अधिकारी हे संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करीत आहेत. ई़डीचे 10 अधिकारी हे मैत्री बंगल्यामध्ये आहेत तर हजारो शिवसैनिक हे गेटवर आहेत. या दरम्यान, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी खिडकीमध्ये येऊन बाहेरचा हवाला घेण्याचा प्रयत्न केला होता तर ते बराच वेळ फोनवर बोलत असल्याचेही पाहवयास मिळत होते. 10 अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि गेटवर सुरक्षा रक्षक याचा अंदाज काय असा सवाल उपस्थित राहत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.