उद्धव ठाकरे यांच्या सभेला भाजप उमेदवाराच्या शुभेच्छा, ठाकरेंच्या सभेपूर्वी भाजपचे…
uddhav thackeray rally: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा शनिवारी संध्याकाळी होत आहे. रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली विधानसभा मतदार संघात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता शेवटचे तीन दिवस राहिले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. सभांमध्ये विरोधी उमेदवार आणि पक्षाला लक्ष केले जात आहे. मुंबईत आणि ठाणे जिल्ह्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना कशी कामगिरी करणार? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. उद्धव ठाकरे आता डोंबिवलीमध्ये सभा घेत आहे. त्यांच्या या सभेसाठी कॅबिनेट मंत्री व महायुतीमधील भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
रवींद्र चव्हाण यांचे शक्तीप्रदर्शन
डोंबिवलीमध्ये एकीकडे शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांचा देखील जोरदार प्रचार सुरू आहे. सकाळपासूनच रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली विधानसभा मतदार क्षेत्रात शक्ती प्रदर्शन करत आपला प्रचार सुरू केलेला आहे. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, डोंबिवली मतदार संघ हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वार्डा, वार्डात प्रचार सुरु आहे. त्याला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या भागाचा विकास कोणी केला आहे? हे नागरिकांना माहीत आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांची सभा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा शनिवारी संध्याकाळी होत आहे. रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली विधानसभा मतदार संघात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहे. ही सभा संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. याबाबत रवींद्र चव्हाण यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे डोंबिवली सभा घेत आहेत. त्यांना शुभेच्छा.
सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. त्याचवेळी विरोधी उमदेवार विरोधी पक्षाच्या नेत्याला सभेसाठी शुभेच्छा दिल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. डोंबिवलीच्या सभेतून उद्धव ठाकरे रवींद्र चव्हाण यांच्यावर कसा हल्ला करणार? त्याकडे लक्ष लागले आहे.