Sanjay Raut ED Raid : ईडीच्या धाडीनंतर साडेतीन तासानंतर राऊतांचे वकील मैत्री बंगल्यावर पोहोचले; मीडियाला म्हणाले…

| Updated on: Jul 31, 2022 | 11:16 AM

संजय राऊत यांचे वकिल विकास साबणे हे मैत्री बंगल्यावर पोहचले आहेत. ईडीच्या धाडीनंतर साडेतीन तासानंतर ते पोहचले आहेत. राऊतांचे वकिल विकास साबणे माध्यमांना बोलताना म्हणाले आहेत की, पंचनामा केला असेल काही डॉक्यूमेंट सही करायचे आहेत. अर्ज रेकॉर्डवर आहे. ते अंडर टेकिंग आहे, आम्ही सहकार्य करत आहोत.

Sanjay Raut ED Raid : ईडीच्या धाडीनंतर साडेतीन तासानंतर राऊतांचे वकील मैत्री बंगल्यावर पोहोचले; मीडियाला म्हणाले...
संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं, सकाळपासूनच्या छापेमारीनंतर मोठी कारवाई
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. पत्राचाळ प्रकरणी ही धाड पडली असून ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई सुरूच आहे. पुढे नेमके काय होणार राऊतांना अटक होणार की, फक्त चाैकशीच यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. गेल्या चार तासांपासून राऊत यांच्या घरात ईडीकडून (ED) झाडाझडती सुरू आहे. मात्र, ही चाैकशी असून किती तास सुरू राहिल हे सांगणे थोडे अवघडच आहे. ईडीच्या या धाडीवर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून आता स्वत: संजय राऊत यांच्या वकिलांनीही (lawyer) यावर आपली प्रतिक्रिया दिलीयं.

संजय राऊत यांचे वकिल विकास साबणे हे मैत्री बंगल्यावर पोहचले

संजय राऊत यांचे वकिल विकास साबणे हे मैत्री बंगल्यावर पोहचले आहेत. ईडीच्या धाडीनंतर साडेतीन तासानंतर ते पोहचले आहेत. राऊतांचे वकिल विकास साबणे माध्यमांना बोलताना म्हणाले आहेत की, पंचनामा केला असेल काही डॉक्यूमेंट सही करायचे आहेत. अर्ज रेकॉर्डवर आहे. ते अंडर टेकिंग आहे, आम्ही सहकार्य करत आहोत. सहकार्य केलं नाही असा प्रश्नच नाही. जवळपास गेल्या 4 तासांपासून राऊतांच्या घराची झडती ही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जातंय. या धाडीसाठी ईडीचे तब्बल दहा अधिकारी राऊतांच्या बंगल्यावर आहेत, बाहेर सुरक्षारक्षकांचा मोठा फाैज फाटा देखील तैनात करण्यात आलायं.

हे सुद्धा वाचा

राऊतांच्या वकिलाने केले मोठे विधान

सकाळी संजय राऊतांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. संजय राऊत त्यांच्या कुटुंबियांसोबत घरी आहेत. अनेक प्रकरणांमध्ये त्यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीकडून दोनदा संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आले होते. आता ईडीचे अधिकारी राऊतांना अटक करणार का हे बघण्यासारखे ठरणार आहे. मात्र, बंगल्याच्या आतमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी झडती सुरू असून बाहेर शिवसैनिकांचे आंदोलन देखील सुरू आहे. शिवसैनिकांकडून भाजपाला टार्गेट करत जोरदार घोषणाबाजी केली जातंय.