आवताडे जिंकणार की भालके? काय आहे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचं गणित? वाचा सविस्तर

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. (read analysis of Pandharpur Assembly by-Election)

आवताडे जिंकणार की भालके? काय आहे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचं गणित? वाचा सविस्तर
bhagirath bhalke
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 11:44 AM

पंढरपूर: राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असून भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलं आहे. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढतही भालके आणि आवताडेंमध्येच होणार आहे. अत्यंत चुरशीच्या या लढतीत कोण जिंकणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर- मंगळवेढ्याचं नेमकं गणित काय? यावर टाकलेला हा प्रकाश. (read analysis of Pandharpur Assembly by-Election)

भालकेंची हॅट्रीक

दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. 2009मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. 2019 मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे 2019मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खरंतर त्यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी भारत भालकेंनी ‘डब्ल्यू’ टर्न घेत कमळ हाती घेता-घेता अचानक राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधलं होतं.

मतदारसंघाची पार्श्वभूमी

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात एकूण 22 गावे आहेत. पंढरपुरातील उरलेली गावं माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडलेली आहेत. पंढरपूरचं देवस्थान आणि पंढरपूरमधील राजकीय घडामोडींमुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं सर्वाधिक वर्चस्व आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व निर्माण करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात चांगलाच जोर दिला आहे.

भाजपचा आटापिटा का?

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं हे सरकार आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागल्याने भाजपला मोठी सल बोचत आहे. त्यामुळे या निडवणुकीत विजयी होऊन जनमत भाजपच्याच बाजूने असून भाजपचीच राज्यात लाट असल्याचं भाजपला दाखवून द्यायचं आहे. शिवाय कोरोनापासून ते आर्थिक आघाडीवर ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा संदेशही भाजपला द्यायचा आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तीन पक्षांना एकटा भाजप टक्कर देऊ शकतो का? याची चाचपणीही भाजपला करायची आहे. त्यामुळेच ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी लिटमस टेस्ट असून त्यामुळेच भाजपने विजयासाठी आटापिटा सुरू केल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

आवताडेंची ताकद

समाधान आवताडे यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. आवताडे गटाच्या ताब्यात दामाजी शुगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, सहकारी संस्था आणि अनेक ग्रामपंचायती आहेत. त्यांचे ग्रामीण भागात चांगले जाळे आहे. सहकाराचं जाळं आणि लोकसंपर्क याचा त्यांना फायदा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

आवताडे-भालकेंची डोकेदुखी

या मतदारसंघात केवळ आवताडे आणि भालके यांच्यातच लढत होणार आहे. आवताडे यांचे बंधू सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीमुळे आवताडे यांची तर शिवसेनेच्या पदाधिकारी शैलजा गोडसे या निवडणूक रिंगणात असल्याने भालके यांची डोकेदुखी वाढली आहे. हे दोन्ही उमेदवार किती मते खातात यावर भालके आणि आवताडे यांचं भवितव्य अवलंबून असल्याचंही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

3 लाख मतदार करणार फैसला

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात एकूण 3 लाख 2 हजार 914 मतदार आहेत. त्यात 1 लाख 43 हजार 746 महिला तर 1 लाख 59 हजार 167 पुरुष मतदार आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांना 89 हजार 87 मते मिळाली होती. तर भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांना 76, 426 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना 54 हजार 124 मते मिळाली होती. काँग्रेसच्या शिवाजी काळुंगे यांना 7232 मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या भारत भालके यांचा या निवडणुकीत अवघ्या 13 हजार 361 मतांनी विजय झाला होता. (read analysis of Pandharpur Assembly by-Election)

सहानुभूती की ताकद?

ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे. गेल्या निवडणुकीत आवताडे यांनी अपक्ष लढूनही 54 हजार मते मिळवली होती. तर भाजपच्या परिचारक यांनी 76 हजार मते मिळवली होती. या दोघांची मते एकत्रित केल्यास 1 लाख 30 हजाराच्यावर जातात. भालके यांना 89 हजार मते मिळाली होती. भाजप आणि आवताडेंची मते एकत्रित केल्यास भालके यांना मिळालेल्या मतांपेक्षा आवताडेंकडे आता 40 हजार मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे आकडेवारीत तरी आवताडेंचा विजय सोपा असल्याचं मानलं जात आहे. मात्र, भालके यांचं निधन झाल्याने भगीरथ यांना मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि काँग्रेसच्या मतांचीही बेगमी त्यांच्याकडे असल्याने या निवडणुकीवर सध्या तरी काहीही भाष्य करणं योग्य नसल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (read analysis of Pandharpur Assembly by-Election)

संबंधित बातम्या:

‘चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांना वाईट वाटू नये म्हणून आम्ही गप्प, नाहीतर…’, जयंत पाटलांचा भाजपला मोठा इशारा

चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का? अजित पवारांनी पाटलांना पुन्हा डिवचलं

ठाकरे सरकार कधी आणि कसं पडणार हे अजिदादांना ठाऊक आहे; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य

(read analysis of Pandharpur Assembly by-Election)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.