Marathi News Politics Rebel gorup of Eknath Shinde and supporting mla may have to face road test before floor test says sachin ahir on amid political crisis in maharashtra
पुणे :एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर आता गेल्या 72 तासांपासून शिवेसना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी एक महत्त्वाचं विधान बंडखोर आमदारांना उद्देशून केलं आहे. फ्लोअर टेस्टआधी रोड टेस्ट द्यावी लागेल, असं म्हणत सचिन अहिर यांनी बंडखोर आमदारांना थेट इशारा दिलाय. पुण्यात शिवसैनिकांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे आता ज्या दिवशी बंडखोर आमदार मुंबईत परततील, तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहेत. पण या दिवशी महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, याचे सुतोवाचही केले जात आहेत. या दिवसासाठी शिवसैनिकांना आतापासूनच सज्ज राहण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात आहेत.
नेमकं काय म्हणाले सचिन अहिर?
पुण्यात शिवसैनिकांना उद्देशून भाष्य करताना सचिन अहिर यांनी म्हटलंय, की…
‘माझं तर स्पष्ट म्हणणंय, पहिली फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा होईल. पण पहिल्या फ्लोअर टेस्टअगोदर त्यांना रोड टेस्टदेखील करावी लागणार आहे. कदाचित ते विमान मुंबईला उतरेल. पण मुंबईला नाही उतरलं तर दुसरी जागा पुण्याची आहे. आणि पुण्याची ज्यावी रोडटेस्ट आली, तेव्हा तुम्ही आमच्यासोबत राहणार आहात की नाही, तुम्ही आमच्यासोबत ताकदीने राहणार आहात की नाही.. या भावनेतून आणि भूमिकेत सांगण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे.’
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात तणाव आहे. ठिकठिकाणी बंडखोर शिवसेना नेत्यांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. तर बहुतांश ठिकाणी बंडखोर शिवसेना आमदारांचे बॅनरही फाडण्यात आले. त्यानंतर दुसरीकडे बंडखोरांच्या समर्थनातही अनेकजण उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. ठाण्यासह मुंबईतही बॅनरला बॅनरे उत्तरं दिली जात आहेत. औरंगाबादमध्येही बंडखोर आमदारांच्या समर्थनात रॅली काढण्यात आली होती.
पाहा सचिन अहिर यांचा व्हिडीओ :
सत्ता स्थापनेचा पेच..
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय. महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुखांना सरकार पडू नये, यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घेतलीय. आता हा सगळा वाद कोर्टात पोहोचला असल्यानं महाराष्ट्राच राजकारण आता रंगतदार वळणावर पोहोचलंय. महाविकास आघाडी सरकार विरुद्ध बंडखोर आमदार, अशी थेट लढत आता राज्यात आहे.