Sanjay Raut ED Raid : राम मंदिरासाठीचे पैसेही घरी ठेवले होते की काय?, आता तुरुंगातही दोन मंत्र्यांबरोबर युतीची चर्चा करतील; शिरसाटांचा हल्लाबोल

Sanjay Raut ED Raid : संजय राऊत यांना अटक झालेली ही प्रोसेस गेल्या चार सहा महिन्यापासून सुरू होती. चार वेळा नोटीस देणे आणि नोटीसला उत्तर न देणे, हजर न राहने त्यामुळे राऊत यांना ईडीने अटक केली असावी. मला काहीच होणार नाही असा राऊतांना कदाचित अधिक विश्वास असावा.

Sanjay Raut ED Raid : राम मंदिरासाठीचे पैसेही घरी ठेवले होते की काय?, आता तुरुंगातही दोन मंत्र्यांबरोबर युतीची चर्चा करतील; शिरसाटांचा हल्लाबोल
राम मंदिरासाठीचे पैसेही घरी ठेवले होते की काय?, आता तुरुंगातही दोन मंत्र्यांबरोबर युतीची चर्चा करतील; शिरसाटांचा हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 9:43 AM

औरंगाबाद: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना अटक झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (sanjay shirsath) यांनी खोचक टीका केली आहे. ही जैसी करनी वैसी भरनी आहे. राऊत लोकांना नावे ठेवत होते. आता त्यांनाच तुरुंगात जावं लागलं आहे. आधीच दोन मंत्री तुरुंगात आहेत. आता हे तिसरे महाशय तिथे पोहोचले आहेत. राऊत तुरुंगात जाऊन दोन मंत्र्यांबरोबर युतीची गप्पा करणार की काय असं वाटतं, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला. राऊतांनी शिवसेनेला फसवलं. उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) फसवलं आणि बाळसााहेबांना फसवलं. त्यांनी बाळासाहेबांच्या शपथा घेऊन शिवसैनिकांना फसवलं. त्याचं वाईट वाटतं. त्यांनी आपल्या सर्वांचं घर फोडलंय. त्यांच्यापासून सावध राहा असं शिवसैनिकांना आवाहन करतो, असंही शिरसाठ म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

ईडीच्या लोकांना राऊतांच्या घरी 10 ते 11 लाख रुपये सापडले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. राम मंदिराच्या उभारणीसाठी शिंदे यांनी जे पैसे दिले होते, तेही या माणसाने घरी ठेवले की काय असं वाटतं. जो करेल तो भरेल. त्यामुळे राऊतांवर ही वेळ आली असावी, असा हल्लाही संजय शिरसाठ यांनी चढवला आहे.

हे सुद्धा वाचा

राऊतांना अति आत्मविश्वास असावा

संजय राऊत यांना अटक झालेली ही प्रोसेस गेल्या चार सहा महिन्यापासून सुरू होती. चार वेळा नोटीस देणे आणि नोटीसला उत्तर न देणे, हजर न राहने त्यामुळे राऊत यांना ईडीने अटक केली असावी. मला काहीच होणार नाही असा राऊतांना कदाचित अधिक विश्वास असावा. पण ईडी ही अशी संस्था आहे, जी पूर्ण कागपत्र घेतल्याशिवाय कुणावर कारवाई करत नाही. राऊतांकडे दहा-अकरा लाख रुपये सापडले आहेत आणि त्यावर शिंदे साहेबांचे नाव होतं, याचा मला अधिक धक्का बसला. म्हणजे रामाचं मंदिर उभारण्यासाठी शिंदे साहेबांनी दिलेले पैसे तेही या माणसाने घरी ठेवले की काय? असा सवाल त्यांनी केला.

राऊतांना अटक झाल्याचा आनंद अधिक

तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवणं, दुसऱ्यांची प्रेत यात्रा काढणे, दुसऱ्यांना रेडे म्हणणं, बायांना वेश्या म्हणणं हा सर्व तळतळाट तुम्हाला लागला आहे. आम्हाला नावं ठेवणाऱ्यावर कारवाई झाली, त्यापेक्षा आनंद शिवसेना फोडणाऱ्या त्या संजय राउतांवर कारवाई झाली याचा आनंद थोडा अधिक आहे, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.