Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Municipal Corporation Election : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक, आरक्षित जागांची 5 ऑगस्टला सोडत

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यांच्या आरक्षित जागांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी सोडत काढली जाईल.

Municipal Corporation Election : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक, आरक्षित जागांची 5 ऑगस्टला सोडत
महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षणाची 5 ऑगस्टला सोडत
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 6:33 PM

मुंबई : महानगरपालिका निवडणुकां (Municipal Corporation Election)चे बिगुल वाजले असून राज्य निवडणूक आयोगा (State Election Commission)ने आज नऊ महानगरपालिकांच्या आरक्षित (Reserved) जागांची सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यांच्या आरक्षित जागांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर 6 ऑगस्ट 2022 रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. यामध्ये औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर आणि नांदेड-वाघाळा या महानगरपालिकांचा समावेश आहे.

अंतिम आरक्षण 20 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार

9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेत. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यांच्या आरक्षित जागांसाठी ही सोडत काढली जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 ऑगस्ट 2022 रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यावर 6 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. दाखल हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण 20 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केले जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

ठाणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत शुक्रवारी

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मागासवर्ग प्रवर्ग, मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी 29 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे 29 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तसेच शनिवारी 30 जुलै, 2022 रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 जुलै ते 2 ऑगस्ट, 2022 दुपारी 3 पर्यंत आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी असून हरकत व सूचना महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर करण्याचे आवाहन केले आहे. (Reservation for general elections of nine municipal corporations will be released on August 5)

हे सुद्धा वाचा

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.