ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता…?, रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच फडणवीसांवर हल्ला
रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट हल्ला केलाय. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता...? असा सवाल त्यांनी केलाय. (Rohini Eknath khadse Attacked on Devendra fadanvis)
मुंबई : जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी घेतला. त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी प्रतिसवाल केलाय. ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?, असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना केलाय. (Rohini Eknath khadse Attacked on Devendra fadanvis over OBC reservation)
रोहिणी खडसे यांचा फडणवीसांवर हल्ला
रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट हल्ला केलाय. त्यांनी ट्विट करत फडणवीसांना रोकडा सवाल केलाय. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असं त्यांनी म्हटलंय.
भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 24, 2021
रोहिणी खडसेंनी असं ट्विट करण्यामागचं कारण काय?
एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पावलोपावली त्रास दिला, क्षणाक्षणाला छळलं, प्रसंगी पक्षातून बाहेर जाण्यासंबंधीचं पाऊल उचलावं लागलं, अशी थेट टीका स्वत: एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना केली होती. ओबीसी नेतृत्व डळमळीत करण्याचं कामही फडणवीसांनी अनेकदा केल्याचं खडसेंनी म्हटलं. याचाच संदर्भ रोहिणी खडसे यांच्या या ट्विटला आहे.
फडणवीसांची घोषणा, रोहिणी खडसेंचा हल्ला
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसींचं रद्द (OBC reservation) केलेल्या अतिरिक्त आरक्षणानंतर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आता ओबीसी नेते आक्रमक पवित्रा घेत आहेत. त्यात भरीस भर म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, असं फडणवीसांनी जाहीर केलंय. त्यांच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे. अशातच रोहिणी खडसे यांनी ट्विटच्या माध्यमातून फडणवीसांवर हल्ला केलाय.
फडणवीसांची घोषणा काय?
पावसाळी अधिवेशनाचा कालावधी, विधानसभा अध्यक्ष निवडणूक, ओबीसी आरक्षण आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं.
(Rohini Eknath khadse Attacked on Devendra fadanvis over OBC reservation)
हे ही वाचा :
OBC विरोधात ठाकरे सरकारचं षडयंत्र, बावनकुळेंचा हल्ला, निवडणुका होऊ देणार नाही, शेंडगेंचा एल्गार