Rohini Khadse : ‘खाली येणाऱ्या कमेंट वाच, मग…’, रोहिणी खडसेंच रूपाली चाकणकरांना जोरदार प्रत्युत्तर

Rohini Khadse : शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शक्ती प्रदर्शन केलं. खडसेंच्या बालेकिल्ल्यात रूपाली चाकणकर यांनी पायी रॅली काढत केले शक्तिप्रदर्शन. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रूपाली चाकणकर यांचे भव्य स्वागत केले.

Rohini Khadse : 'खाली येणाऱ्या कमेंट वाच, मग...', रोहिणी खडसेंच रूपाली चाकणकरांना जोरदार प्रत्युत्तर
Rohini Khadse vs Rupali chakankar
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 12:35 PM

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘रूपाली चाकणकर ह्या बाप बदलणांऱ्या सारख्या आहेत’ असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. “रूपाली चाकणकर यांना बाप बदलणं सोपं आहे. आधी पवार साहेबांसोबत होत्या, नंतर सुप्रिया सुळे. ज्या जनतेने सर्व दिलं, त्या जनतेच्या होऊ शकत नाहीत, त्या आपल्या काय होतील?” अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांवर टीका केली. “माझ्या वडिलांच्या वारशावर मी सध्या काम करते, याचा मला अभिमान आहे. माझ्या वडिलांचा वारसा घेऊनच मी पुढे गेली आहे” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

“तुमच्या नेहमीच्या वक्तव्याबाबत खाली येत असलेल्या कमेंट एकदा वाचा. मग तुम्हाला तुमचं अस्तित्व कळेल. ज्यांचं नगरपालिकेत डिपॉझिट जप्त झालंय अशा लोकांचा जनाधारक शिल्लक राहिलेला नाहीय. रूपाली चाकणकरांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही” असं रोहिणी खडसे म्हणाल्या. “रूपाली चाकणकर ह्या शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने सध्या पद भोगत आहेत. शरद पवार साहेबांच्या भरोशावर आतापर्यंत पद यांना मिळत आली आहेत” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

कशावरुन सुरु झालं वाक युद्ध?

आज रूपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंवर टीका केली. वडिलांच्या जनाधारावर निवडणूक लढवत आहेत, लाडक्या बहिणींच पंधराशे रुपयाने काय होतं? यावरून वाक युद्ध सुरू झालं.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“रूपाली चाकणकर यांना मी म्हणतो, दुसऱ्यांच्या घरात डोकावणं चांगलं नाही. रूपाली चाकणकर आधी तुम्ही तुमचं स्वतःचं बघा. आधी शरद पवारांकडे तुम्ही होता, नंतर अजितदादांकडे गेलात, तर तुमचं काय?” असं एकनाथ खडसे म्हणाले. रूपाली चाकणकर यांनी खडसे कुटुंबीयांवर मुक्ताईनगरमध्ये येऊन टीका केली, याला एकनाथ खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.