फडणवीस सरकारमध्ये टँकर घोटाळा, रोहित पवारांच्या आरोपांची चौकशी होणार

रोहित पवारांच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी ग्वाही अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

फडणवीस सरकारमध्ये टँकर घोटाळा, रोहित पवारांच्या आरोपांची चौकशी होणार
Follow us
| Updated on: Jan 21, 2020 | 8:55 AM

अहमदनगर : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अहमदनगरमध्ये टँकर घोटाळा झाल्याचा आरोप (Rohit Pawar alleges Tanker Scam) राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यानंतर रोहित पवारांच्या तक्रारीची चौकशी करणार, अशी ग्वाही अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

बैठकीत रोहित पवार यांनी फडणवीस सरकारच्या काळात दुष्काळ पडला असताना झालेल्या टँकर छावणी आणि इतर दुष्काळ निवारण कामांची चौकशी करण्याची मागणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा यासाठी मोठा निधी मागितला असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.

अहमदनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामं, टँकर पाणीपुरवठा, तसेच चारा छावण्यांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार रोहित पवार यांनी केली होती. या तिन्ही आरोपांबाबत उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रोहित पवार यांनी संगमनेरमध्ये भरकार्यक्रमात मंचावरुनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन लावला होता. “नमस्ते मोदी साहेब, रोहित पवार बोलतोय. नाव आपण ऐकलं असेल. साहेब काही नाही, थोरात साहेबांनी संगमनेरमध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्याठिकाणी आलो होतो. अनेक युवक-युवती आले आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे गेली पाच वर्ष जो विकास झाला नव्हता तो आता होईल.” असं रोहित पवार म्हणाले होते. Rohit Pawar alleges Tanker Scam

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.