‘फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं’, रोहित पवारांची खोचक टीका

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नवाब मलिकांनी लवंगी फटाका फोडला आहे. दिवाळीपर्यंत थांबा, दिवाळीनंतर मी बॉम्बच फोडणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावलाय.

'फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं', रोहित पवारांची खोचक टीका
रोहित पवार, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 9:19 PM

पुणे : दिवाळीच्या तोंडावर राज्यात राजकीय फटाके उडवण्याची एकही संधी महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते सोडताना दिसत नाहीत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नवाब मलिकांनी लवंगी फटाका फोडला आहे. दिवाळीपर्यंत थांबा, दिवाळीनंतर मी बॉम्बच फोडणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावलाय. (Rohit Pawar criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis over Nawab Maliks Allegation)

देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याऐवजी दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं. लोकांची कामं तरी होतील. पवार कुटुंब ईडी, सीबीआय अशा कारवायांना बधणार नाही. शरद पवारांविरोधात कुणीतरी ट्रकभर पुरावे घेऊन येणार होतं, त्याचं काय झालं? शरद पवार हे योद्धे आहेत आणि त्यांच्यामागे जनतेची ताकद आहे. पवार कुटुंबावर होत असलेल्या कारवायांकडे आम्ही लक्षही देत नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी फडणीसांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर राज्यात महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठलाय, अशी टीकाही त्यांनी केलीय.

नवाब मलिकांचा फडणवीसांवरील आरोप काय?

समीर दाऊद वानखेडे जो गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये कामन करतोय त्यांच्याही बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना यासाठीच आणलं गेलं होतं की त्यांनी पल्बिसीटी करुन निर्दोष लोकांना फसवावं. ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा. मोठ मोठे ड्रग्ज पॅडलर्स मग तो काशिफ खान असो त्याला सोडलं जातं. ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडलं जातं. राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे. ड्रग्जच्या खेळाचा मास्टर माईंड राज्याचे माजी मुख्यमंत्री तर नाही हा प्रश्न आमच्या डोक्यात येत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता.

फडणवीसांचं मलिकांना प्रत्युत्तर

‘मलिक यांनी ट्विट केलेल्या फोटोतील व्यक्तीशी आमचा कोणताही संबंध नाही, असं त्यांनी सांगितलं. मलिकांनी दिवाळीत लवंगी फटाका लावला, आता लक्षात ठेवावं आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेल. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत. त्यांनी माझ्याशी बोलू नये. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध कसे आहेत याचे पुरावे मी तुम्हाला देणारच आहे. पण शरद पवारांनाही हे पुरावे देणार आहे. दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली. त्याला अंतापर्यंत न्यावे लागेल’, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

इतर बातम्या :

राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले, विखे-पाटलांचा ठाकरे सरकारवर घणाघात

‘अन्यथा या सर्व विद्यार्थ्यांना संघटित करुन सरकार विरोधात आंदोलन करू’, सदाभाऊ खोतांचा राज्य सरकारला इशारा

Rohit Pawar criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis over Nawab Maliks Allegation

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.