पुणे: लसींच्या तुटवड्यामुळे देशातील लसीकरणाची मोहीम ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लसीकरणासाठी पैसा कसा उभा करायचा याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. तसंच ट्विटच रोहित पवार यांनी केलं आहे. (rohit pawar given financial planning advice to central government for vaccination)
देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली 35 हजार कोटी रुपयांची तरतूद आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळालेले अतिरिक्त 99 हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील, असा सल्ला रोहित पवार यांनी केंद्राला दिला आहे.
राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथं कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि जीएसटीमध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण ठरवावं. असं केलं तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू, असा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, आरबीआयने केंद्र सरकारला 99122 कोटी रुपयांचा सरप्लस निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला हा मोठा निधी मिळणार आहे. जुलै 2020 पासून ते मार्च 2021 पर्यंतची ही सरप्लस रक्कम केंद्र सरकारकडे जमा करण्यात येणार आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. मात्र कोरोनासाठी मे महिना घातक ठरला आहे. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या 21 दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे यंदाचा मे महिना देशासाठी धोकादायक ठरल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे गेल्या 21 दिवसात 71 लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. तर गेल्या महिन्यात 69.4 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. मे महिन्यातील मृत्यूची आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत 83 हजार 135 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा गेल्यावर्षाच्या मृत्यूदरापेक्षा 48 हजार 768 हून अधिक आहे. मे महिन्याच्या प्रत्येक दिवसात आतापर्यंत सरासरी 4,000 मृत्यू (3,959) नोंदविण्यात आले आहेत. मात्र या डेटामध्ये काही आधी झालेल्या मृत्यूचाही समावेश आहे. भारतात 14 मेपासून आतापर्यंत केवळ दोन वेळा मृत्यूची संख्या 4 हजारच्या खाली नोंदवण्यात आली आहे.
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 57 हजार 299 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 194 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 57 हजार 630 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. (rohit pawar given financial planning advice to central government for vaccination)
देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी ₹ ची तरतूद आणि @RBI कडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी ₹ या कार्यक्रमासाठी वापरता येतील.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 22, 2021
संबंधित बातम्या:
मोठी बातमी! केंद्र सरकारला RBI देणार 99122 कोटी, कशासाठी?; जाणून घ्या सविस्तर!
ब्लॅक फंगसला महामारी घोषित करा, औषधांचा साठाही उपलब्ध करा; सोनिया गांधींचं मोदींना पत्रं
Second Wave | भारतासाठी मे महिना घातक, 21 दिवसात 71 लाखांहून अधिक कोरोनाबाधित, मृतांचा आकडाही गंभीर
(rohit pawar given financial planning advice to central government for vaccination)