Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM निवासस्थान, संसंद भवनाचं काम पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करा; रोहित पवारांचा भातखळकरांना टोला

आमदारांच्या हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने टेंडर काढले आहे. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. (rohit pawar slams atul bhatkhalkar over Central Vista Redevelopment Project)

PM निवासस्थान, संसंद भवनाचं काम पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करा; रोहित पवारांचा भातखळकरांना टोला
rohit pawar
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 11:24 AM

पुणे: आमदारांच्या हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने टेंडर काढले आहे. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्याला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भातखळकरांनी पंतप्रधानांचं निवासस्थान आणि नव्या संसद भवनाचं काम पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावा आणि केंद्राला लसीकरणाकडे लक्ष देण्यास सांगावं, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. (rohit pawar slams atul bhatkhalkar over Central Vista Redevelopment Project)

रोहित पवार यांनी ट्विट करून अतुल भातखळकर यांना हा टोला लगावला आहे. अतुल भातखळकरजी आपला मुद्दा मला योग्य वाटतो, पण टेंडर काढलं म्हणजे लगेच पैसे खर्च झाले असं नाही. टेंडर ते कामाचं बील देणं याला किती वेळ लागतो, हे तुम्हाला माहीतच असेल! आमदार निवासाचं म्हणाल तर लांबून येणाऱ्या आमदारांसाठी ते महत्वाचं आहे. तरीही मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन. तुम्हीही 22 हजार कोटींचा सेंट्रल विस्टा प्रकल्प आणि 13 हजार कोटींचं पंतप्रधान निवासस्थानाचं काम पुढं ढकलून लसीकरणाकडं लक्ष देण्यासाठी केंद्राकडं पाठपुरावा केला तर लसीकरणाबाबत आपल्या राज्यावरील अन्याय दूर होईल, असा चिमटा रोहित पवार यांनी काढला आहे.

सध्या राजकारण बाजूला ठेवून आपण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करूयात! मी काम करताना राजकारण बाजूला ठेवलंय, तुम्हीही एकदा प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे?, असा सवालही त्यांनी केला आहे.

भातखळकर काय म्हणाले होते?

यापूर्वी भातखळकर यांनी ट्विट करून एमएलए हॉस्टेलच्या मुद्द्यावरून रोहित पवारांवर टीका केली होती. MLA हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने 900 कोटीचे टेंडर काढले आहे. संसदभवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या रोहित पवारांच्या नजरेतून हे सुटलेलं दिसतंय. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना, अशी टीका भातखळकर यांनी केली होती. त्याला रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. (rohit pawar slams atul bhatkhalkar over Central Vista Redevelopment Project)

संबंधित बातम्या:

मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच ‘मन की बात’ची टेप लावली, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची टीका

LIVE | औरंगाबादच्या ऐतिहासिक पाणचक्की तलावातील शेकडो माश्यांचा मृत्यू

पंढरपुरातील पराभवाचे हादरे नांदेडपर्यंत, तीन वेळा आमदार शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर

(rohit pawar slams atul bhatkhalkar over Central Vista Redevelopment Project)

शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.